नीलम गोऱ्हे यांच्या साहित्य संमेलनातील विधानावरून नाशिकमध्ये उद्धवसेना-शिंदेसेनेत वाद
By संजय पाठक | Updated: February 24, 2025 17:51 IST2025-02-24T17:48:23+5:302025-02-24T17:51:01+5:30
शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात केलेल्या विधानावरून सध्या वाद सुरू झाला आहे

नीलम गोऱ्हे यांच्या साहित्य संमेलनातील विधानावरून नाशिकमध्ये उद्धवसेना-शिंदेसेनेत वाद
संजय पाठक, नाशिक- शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात केलेल्या विधानावरून वाद सुरू झाला असून त्यात नाशिकमध्ये उध्दव सेना आणि शिंदे सेनेत देखील वाद सुरू झाले आहेत. नीलम गोऱ्हे यांनी उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा आरोप उध्दव सेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केल तर पांडे ज्येष्ठ नेते होते तर त्यांना गोऱ्हे यांना पैसे देण्याची गरज का भासली असा प्रश्न शिंदे सेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले की, २०१४ राेजी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी मी आणि अजय बोरस्ते (सध्या शिंदे सेनेचे उपनेते) प्रयत्न करीत होते. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या जवळच्या कार्यकत्य'ने पैसे दिल्यास नीलम गोऱ्हे उमेदवारी मिळवून देतील असे सांगितले. त्यानुसा आपण पैसे दिले परंतु उमेदवारी बेारस्ते यांनाच मिळाली असे त्यांनी सांगितले. पाठपुरावा केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या रकमेतील काही रक्कम परत दिली असे पांडे यांनी सांगितले त्यावर शिंदे सेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी २०१४ मध्ये नीलम गोऱ्हे यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी नव्हती, त्यावेळी रविंद्र मिर्लेकर संपर्क प्रमुख होते मग त्यांनी गोऱ्हे यांच्या कडे जबाबदारी नसताना पैसे का दिले? पक्षात ज्येष्ठ असताना उमेदवारीसाठी त्यांना अशी रक्कम का द्यावीशी वाटली याचेही स्पष्टीकरण झाले पाहिजे असे बोरस्ते म्हणाले.