उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 04:34 PM2023-03-26T16:34:31+5:302023-03-26T16:35:04+5:30
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे
सुदर्शन सारडा
ओझर (जि नाशिक) : मालेगाव येथे आज सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेसाठी उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळ येथे ठीक चार वाजता आगमन झाले. त्यांच्या समवेत पत्नी रष्मी ठाकरे, सुभाष देसाई आहेत.
यावेळी स्थानिक नेते माजी आमदार अनिल कदम यांनी त्यांचे स्वागत केले. याठिकाणीही पोलीस बंदोबस्त होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील सभेनंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज मालेगावी सायंकाळी ५ वाजता पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावी अतिरिक्त कुमक मागवत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या होम ग्राऊंडवर होणाऱ्या या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. यावेळी बबनराव घोलप, विजय करंजकर,सुनील बागुल, विनायक पांडे,सुधाकर बडगूजर ,विलास शिंदे,वसंत गिते , डी जी, सुर्यवंशी आदींनी विमानतळ येथे त्यांचे स्वागत केले पुढे ताफा मालेगावकडे मार्गस्थ झाला आहे.