उध्दव ठकारे यांनी बोलवले मात्र करंजकर नाही गेले! भूमिका गुलदस्त्यात
By संजय पाठक | Published: April 15, 2024 04:26 PM2024-04-15T16:26:32+5:302024-04-15T16:27:28+5:30
दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनी केला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितले आहे.
नाशिक- उध्दव सेनेचे नाराज पदाधिकारी विजय करंजकर यांना उध्दव ठाकरे
यांनी पाचारण केले मात्र, ते गेलेच नसल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात
आहे. दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनी
केला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितले
आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी विजय करंजकर यांना आधी कामाला लागा सांगण्यात
आले आणि त्यानंतर त्यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना
उमेदवारी देण्यात आल्याने करंजकर अत्यंत नाराज झाले. त्याांनी अपक्ष
निवडणूक लढवण्याचा विचार बोलवून दाखवला हाेता. त्यानंतर करंजकर हे उध्दव
ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार होते.
मात्र, उध्दव ठाकरे हे दिल्ली येथे इंडीया आघाडीची बैठक घेऊन विलंबाने म्हणजे मध्यरात्री मुंबईला आल्याने त्यादिवशी करंजकर यांची भेट टळली. त्यानंतर रविववारी (धि.१४) उध्दव ठाकरे यांनी वेळ दिली होती. मात्र, आपल्याला अशी कोणत्याही प्रकारे वेळ दिली गेली नव्हती, ते वेळ देतील तेव्हा एक दोन दिवसास भेट
घेऊन आपण निर्णय घेणार असल्याचे विजय करंजकर यांनी सांगितले.