अभ्यासक्रम मान्यता रद्दवरुन ‘युजीसी’चा युटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:10 PM2018-08-14T17:10:23+5:302018-08-14T17:10:39+5:30

देशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत

UGC's anniversary of the revocation of the course approval | अभ्यासक्रम मान्यता रद्दवरुन ‘युजीसी’चा युटर्न

अभ्यासक्रम मान्यता रद्दवरुन ‘युजीसी’चा युटर्न

Next
ठळक मुद्देदेशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत.

नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या १७ अभ्यासक्रमांना केंद्रिय अनुदान आयोगाने नकार दिल्यानंतर आता मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केले नसल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे. यावरुन ‘युजीसी’ने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रम प्रस्ताव छाननीत ज्या अभ्यासक्रमात त्रुटी आढळून येतील, या भरुन काढण्यासाठी संबंधित विद्यापीठांना एक महिन्याची मूदत देण्यात येणार असल्याचे युजीसीने म्हटले आहे.
युजीसीने हे पत्र मुक्त विदयापीठांना पाठविले असून, ते यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठालाही मिळाले आहे. इतर अभ्यासक्रम व अनुषांगिक माहिती १६ आॅगस्टला आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरही अभ्यासक्रमांबाबत काही शंका असल्यास आयोगाकडे दाद मागता येणार असल्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी चिंता करु नये, असे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी सांगितले आहे.

Web Title: UGC's anniversary of the revocation of the course approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.