पळसन येथे आदिवासींचे उलगुलान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 04:21 PM2019-11-26T16:21:15+5:302019-11-26T16:22:16+5:30

सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्या करीता उलगुलान पुकारले आहे. यावेळी आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 Ugulan of the tribes at Palasan | पळसन येथे आदिवासींचे उलगुलान

पळसन येथे आदिवासी विकास संघर्ष युवा संघटनेचे बिरसा मुंडा उल्ल गुल्लान प्रसंगी उपस्थितधर्मराज भोये, अशोक भोये, अशोक पवार, हरिश्चंद्र मोरे, सागर गावित, सुनिल गोतुर्णे, शेखर दळवी, राजेश देशमुख, महेश बोरसे, राकेश जाधव, जगदीश पाडवी, भास्कर गवळी, विशाल गवळी, विजय महाले, रमेश धुम, रोहीदास धुम, नामदेव पाडवी.

Next
ठळक मुद्देयाप्रसंगी पार पडलेल्या बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगतांना भेडसावणा-या अनेक गंभीर समस्यावर चर्चा करण्यात आली. उलगुलान म्हणजे अन्यायाविरु द्ध एकत्र येऊन लढा देणे. यासाठी तालुक्यातील आदिवासी युवकांची एकच संघटना ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


सुरगाणा :
तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्या करीता उलगुलान
पुकारले आहे. यावेळी आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सुरगाणा तालुका हा पावसाचे माहेरघर, परंतु पाणी अडवले नसल्यामुळे तालुक्यातील बरेच गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यामुळे आतापासुनच ज्या ठिकाणी पाणी असेल अशा ठिकाणी तरूणांनी एकत्र येऊन वनराई बंधारे बांधून थोडेफार पाणी संकट दूर होईल असे जलपरिषदेचे योगेश गावित यांनी सांगितले.
अन्य तालुक्याच्या दरवर्षी पावसाळ्यात सरासरी अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. तरी ऊन्हाळ्यात तालुक्यातील निम्या पेक्षा जास्त गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. आज पर्यंत तालुक्यात शेती सिंचनासाठी एकही मोठे धरण का झाले नाही अशा एक ना अनेक प्रश्नांनावर बैठकीत चर्चा झाली.
या प्रकारच्या समस्या हेरु न त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्या साठी प्रत्येक गावपातळीवरीलबेरोजगार युवकांनी संघिटतपणे लढा देण्याची गरज असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.या करीता आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा उभारु न, आदिवासी विकास युवा संघर्ष संघटना, स्थापन करण्यात आली आहे.
या बैठकीला तालुक्याच्या कानाकोप-यातील युवक आयोजक यावेळी आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाप्रमुख रतन चौधरी, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडूरंग पवार, आदिवासी युवा संघर्ष प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष दीपक चव्हाण, हेमराज धुम हरिश्चंद्र धुम, संजय पाडवी, सचिन महाले, प्रशांत माळघरे, गणेश वाघमारे, योगेश गावित आदि उपस्थित होते. सुनिल भुसारे यांनी कार्यक्र माचे प्रस्ताविक केले.

 

 

Web Title:  Ugulan of the tribes at Palasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.