भुजबळ समर्थकांच्या राज भेटीने उद्धव नाराज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:42 PM2018-02-07T14:42:51+5:302018-02-07T14:46:10+5:30

महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठरविल्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मध्यंतरी रद्द केला.

Ujjwal dissatisfied with the support of Raj Bhujbal supporters! | भुजबळ समर्थकांच्या राज भेटीने उद्धव नाराज !

भुजबळ समर्थकांच्या राज भेटीने उद्धव नाराज !

Next
ठळक मुद्देवेळ देण्यास टाळाटाळ : खडसेंच्या भेटीनेही भर भुजबळ यांना ‘क्लिनचिट’ देणारे पत्र देणा-या शिवसेनेला टाळले

नाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा काहीएक दोष नसल्याचे सांगत भुजबळ यांना ‘क्लिनचिट’ देणारे पत्र देणा-या शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता व तितकाच संताप व्यक्त केला जात असून, त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मागितलेली वेळ देण्यास टाळटाळ केली जात असल्याचे चर्चा होऊ लागली आहे.
महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठरविल्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मध्यंतरी रद्द केला. भुजबळ यांच्याविरोधात सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची तक्रार भुजबळ समर्थक करीत असल्याने त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा उपक्रम हाती घेत एक प्रकारे सरकार व न्यायालय दोघांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. दोन दिवसांपुर्वीच भुजबळ समर्थकांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेवून भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून ऐनवेळी भुमिका जाहीर करण्याचे आश्वासन देतानाच भुजबळ समर्थकांना खडे बोल सुनावले हा भाग अलहिदा. परंतु ज्या भुजबळांवर नाशिक महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रछन्न आरोप करून राळ उठवून दिली होती त्या राज ठाकरे यांच्या दरबारात भुजबळ यांच्यासाठी समर्थकांनी हजेरी लावण्याची बाब शिवसेनेला खटकली आहे. मुळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी भाजपाने छगन भुजबळ यांना घेरण्यास सुरूवात केल्यानंतर सर्वात अगोदर शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्टÑ सदन बांधकामाचा विषय मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला असून, त्यात एकट्या भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ यांना क्लिचिट दिली होती व भुजबळ यांची चौकशी करायची असेल तर संपुर्ण उपसमितीचीही चौकशी करावी लागेल, त्यामुळे भुजबळ यांना न्याय द्यावा अशी विनंती पत्रात केली होती.

Web Title: Ujjwal dissatisfied with the support of Raj Bhujbal supporters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.