‘तालाभिषेक’ संगीत महोत्सवात उल्हास कशाळकर यांचे गायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:36 PM2020-02-13T23:36:52+5:302020-02-14T00:53:17+5:30

नाशिक : संगीत क्षेत्रातील कार्यरत ‘पवार तबला अकादमी’ या संस्थेस यंदा ५० वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने वर्षभर चार पुष्पात ...

Ulhas Kashalkar's singing at 'Talabhishek' Music Festival | ‘तालाभिषेक’ संगीत महोत्सवात उल्हास कशाळकर यांचे गायन

‘तालाभिषेक’ संगीत महोत्सवात उल्हास कशाळकर यांचे गायन

Next

नाशिक : संगीत क्षेत्रातील कार्यरत ‘पवार तबला अकादमी’ या संस्थेस यंदा ५० वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने वर्षभर चार पुष्पात ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले गेले.
याच महोत्सवांतर्गत गायनाचा कार्यक्र म शनिवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजता कुर्तकोटी शंकराचार्य न्यास सभागृह, गंगापूररोड येथे होणार आहे. कार्यक्र माच्या उद्घाटनानंतर ‘तालाभिषेक’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर आणि ज्येष्ठ तबलावादक व गुरू तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते होईल. स्मरणिका प्रकाशन सोहळ्यानंतर उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होईल. कार्यक्र मास सर्वांसाठी प्रवेश खुला असून, रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नितीन पवार व रघुवीर अधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Ulhas Kashalkar's singing at 'Talabhishek' Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.