उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:24 AM2018-12-08T01:24:31+5:302018-12-08T01:24:53+5:30
पुणे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना क्र ांतिकार्याचे महत्त्व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पटवून दिले आणि शेकडो तरूण या क्रांतिकार्यासाठी तयार केले, असे प्रतिपादन डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले.
इंदिरानगर : पुणे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना क्र ांतिकार्याचे महत्त्व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पटवून दिले आणि शेकडो तरूण या क्रांतिकार्यासाठी तयार केले, असे प्रतिपादन डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले.
श्री मोदकेश्वर सेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने कै. मातोश्री सीताबाई निरगुडे स्मृती व्याख्यानमालेत रत्नपारखी बोलत होते. यावेळी रत्नपारखी म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही शिक्षणाच्या वेळी झाली. तसेच मित्रमेळा या संघटनेला सन १९०४ मध्ये व्यापक रूप देण्यासाठी नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची त्यांनी स्थापना केली. असे त्यांनी सांगितले. यावेळी मोहिनीराज कुलकर्णी, उत्तम निरगुडे उपस्थित होते.