मुद्देमाल वाटप : सोनसाखळी, दुचाकी केल्या परत चोरीस गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:32 AM2018-01-07T00:32:37+5:302018-01-07T00:33:13+5:30

नाशिक : सोनसाखळी, दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना शहरात घडत असतात आणि त्याबाबत नागरिकांमधून ओरडही होते. मात्र या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसत नाही

Ultimate Allocation: Sonassakhi, Biking made back after getting stolen goods recovered | मुद्देमाल वाटप : सोनसाखळी, दुचाकी केल्या परत चोरीस गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्या

मुद्देमाल वाटप : सोनसाखळी, दुचाकी केल्या परत चोरीस गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुद्देमाल मूळ मालकांना समारंभपूर्वक प्रदान मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल

नाशिक : सोनसाखळी, दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना शहरात घडत असतात आणि त्याबाबत नागरिकांमधून ओरडही होते. मात्र या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसत नाही तर गुन्हा नोंदविला गेल्यानंतर त्याचा तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचाही प्रयत्न केला जातो. शनिवारी (दि.६) याचा प्रत्यय पुन्हा नाशिककरांना आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते सुमारे २० लाख २५ हजारांचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
दिवसेंदिवस शहर वाढत असून, विविध गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे; मात्र या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावरून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल होऊन चोरट्यांसह मुद्देमालही पोलीस हस्तगत करत आहे. चोरी गेलेला मुद्देमाल सलग तिसºयांदा अशा प्रकारे आयुक्तालयाकडून समारंभपूर्वक नागरिकांना परत करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘महाराष्टÑ टाइम्स’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते. व्यासपीठावर उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदी उपस्थित होते. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तर सरकारवाडा पोलीस ठाणेच्या हद्दीतील वीस हजार, पंचवटीमधील एक लाख, गंगापूर हद्दीतील एक लाख २९ हजार, आडगावच्या हद्दीतील एक लाख वीस हजार, म्हसरूळमधील ५७ हजार तर मुंबईनाका हद्दीतील चोरी झालेला तीन लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, इंदिरानगरच्या हद्दीतील ४ लाख ८४ हजार रुपयांचा चोरी झालेला मुद्देमाल, उपनगरमधील ८०० हजार, नाशिकरोड-८३ हजार, सातपूर दोन लाख १८ हजार ५०० रुपये आणि अंबडच्या हद्दीतील ३ लाख ५३ हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत संबंधितांना परत केला. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी केले.
१९ दुचाकींचा लागला छडा
चोरी झालेल्या दुचाकींपैकी १९ दुचाकींचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले. या दुचाकी मालकांचा शोध घेत शनिवारी दुचाकीची चावी समारंभपूर्वक प्रदान केली. आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान, सर्वाधिक ४ दुचाकी सातपूरच्या हद्दीतील आहे, तर आडगाव, मुंबईनाका, नाशिकरोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी झालेल्या प्रत्येकी तीन तर भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर पोलीस ठाण्यांमधील प्रत्येकी एक दुचाकीचा समावेश आहे.

Web Title: Ultimate Allocation: Sonassakhi, Biking made back after getting stolen goods recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस