अखेर ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट््सला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:17 AM2019-03-18T01:17:14+5:302019-03-18T01:18:34+5:30

सन २०१३ पासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्््स बसविण्याबाबतची चर्चा होत असताना आता या नंबर प्लेट््सला मुहूर्त लागला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नव्या आणि जुन्या वाहनांनाही अशा प्रकारच्या सुरक्षित नंबर प्लेट््स बंधनकारक करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मोटार वाहन नियमानुसार अशा प्रकारच्या नंबरप्लेट््स वाहनांना लागणार आहेत.

Ultimately the 'High Security' number was changed to Platsula Muhurat | अखेर ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट््सला मुहूर्त

अखेर ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट््सला मुहूर्त

Next
ठळक मुद्देएप्रिलमध्ये अंमलबजावणी : जुन्या वाहनांनाही सक्ती;कंपनीकडूनच मिळणार नव्या वाहनांना नंबरप्लेट्स

नाशिक : सन २०१३ पासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्््स बसविण्याबाबतची चर्चा होत असताना आता या नंबर प्लेट््सला मुहूर्त लागला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नव्या आणि जुन्या वाहनांनाही अशा प्रकारच्या सुरक्षित नंबर प्लेट््स बंधनकारक करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मोटार वाहन नियमानुसार अशा प्रकारच्या नंबरप्लेट््स वाहनांना लागणार आहेत.
वाहनांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहित नमुन्यात बदलविण्याची तरतूद असून, आता या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचे पत्र नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झाले आहे. केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९च्या नियम ५० नुसार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट असावी, असा नियम आहे. वाहनांची चोरी आणि त्यातून घडणाऱ्या घातपाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या नंबरप्लेट््स महत्त्वाच्या ठरणार असल्याने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
नव्या वाहनांना संबंधित वाहन उत्पादन कंपनीच अशा प्रकारची नंबरप्लेट देणार आहे. किंबहूना तसे संबंधिताना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जुन्या वाहनांनादेखील हाच नियम असून, त्यांच्यासाठी डिलर आणि पुरवठादार नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. प्रारंभी आरटीओ कार्यालयाकडूनच अशा प्रकारच्या हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला होता. अशा प्रकारच्या नंबरप्लेट काही दलालांकडेदेखील आढळून आल्यानंतर ही योजना काहीकाळ सुरक्षिततेच्या कारणास्तव गुंडाळण्यात आली होती. आता हीच योजना अधिक सुरक्षिततेने सज्ज असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कायमस्वरूपी नंबरप्लेट
केंद्रीय मोटारवाहन विभागाकडून अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात आल्यामुळे वाहनावर एकदा अशा प्रकारची हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावली तर ती कायमस्वरूपी राहणार आहे. ती काढता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर प्लेट वॉटरप्रुफ आणि अ‍ॅल्युमिनियमच्या साहायाने बनविण्यात आलेली असेल. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाचे चक्राकार होलोग्राम असणार आहे. तसेच ‘इंडिया’ही अक्षरेही असणार आहेत.

Web Title: Ultimately the 'High Security' number was changed to Platsula Muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.