अखेर मोजणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:28 AM2018-05-10T00:28:42+5:302018-05-10T00:28:42+5:30

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध असणाऱ्या शिवडे व घोरवड शिवारात बुधवारपासून (दि. ९) संयुक्त मोजणीस प्रारंभ झाल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. तथापि, शिवडे गावातील काही शेतकºयांचा या मोजणीला विरोध असल्याचे दिसून आले.

Ultimately start measuring | अखेर मोजणीस प्रारंभ

अखेर मोजणीस प्रारंभ

Next
ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर शिवडे येथे सापडला मुहूर्त..शेतकºयांनी संमती दर्शविल्यानंतर शिवडे शिवारात मोजणीला प्रारंभ

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध असणाऱ्या शिवडे व घोरवड शिवारात बुधवारपासून (दि. ९) संयुक्त मोजणीस प्रारंभ झाल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. तथापि, शिवडे गावातील काही शेतकºयांचा या मोजणीला विरोध असल्याचे दिसून आले.
समृद्धी महामार्गाविरोधात जोरदार लढा उभारणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे वर्षभरापूर्वी मोजणीस आलेल्या अधिकाºयांना परत लावण्यासह हिंसक वळण प्राप्त झाले होते. तेव्हापासून शिवडे येथे समृद्धीविरोधी वातावरणात धगधग सुरूहोती. शिवडे व घोरवड परिसरात बागायती जमिनी असल्याने या शेतकºयांना या प्रस्तावित महामार्गाला विरोध केला होता. बागायती जमिनी वगळून महामार्ग अन्य भागातून नेण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली होती. समृद्धी महामार्गाला विरोध नोंदविण्यासाठी शेतकºयांनी मोजणीच्या वेळी रस्त्यावर टायर पेटवून देणे, शेतात सरण रचणे, रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे, झाडाला गळफास टांगणे आदी आंदोलने केली होती. राष्टÑवादी कॉँग्रेसची संघर्ष यात्राही शिवडेत आल्याने शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढल्याने या समृद्धीविरोधी आंदोलनास आणखी बळ मिळाले होते.
बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार नितीन गवळी, मीनाक्षी राठोड यांच्यासह कृषी, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, बांधकाम, महसूल, पाटबंधारे यांच्यासह कर्मचाºयांचा ताफा पोलीस निरीक्षक मुकुंद
देशमुख यांच्यासह शिवडे घाटात दाखल झाला.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिवडे-सोनांबे घाटात मोजणीस प्रारंभ करण्यात आला. काही शेतकºयांच्या गटाची मोजणी केल्यानंतर वनविभागाच्या हद्दीतील मोजणी करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १ किलोमीटर अंतराची मोजणी झाली होती. मोजणीसाठी अधिकारी शिवडे गावाजवळ गेल्यानंतर मोजणीला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, काही शेतकºयांनी मोजणीला अधिकारी येणार असल्याने स्वत:च्या शेतात पाला-पाचोळा पेटवून मोजणीविरोधी इरादे स्पष्ट केले होते. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह १० पोलीस कर्मचारी मोजणीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. या मोजणीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.तहसीलमध्ये अधिकाºयांची बैठकसमृद्धी महामार्गाचा विरोध कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठका झाल्या होत्या. त्यानंतर शेतकºयांना जमिनी देताना शासनापुढे काही अटी व शर्थी ठेवल्या होत्या. सदर प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात काही शेतकºयांचा विरोध मावळल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सिन्नर तहसील कार्यालयात संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सकाळपासून संयुक्त मोजणी व मूल्यांकनास प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकºयांनी संमती दर्शविल्यानंतर शिवडे शिवारात मोजणीला प्रारंभ करण्यात आला. सुमारे ८०० मीटरची मोजणी करण्यात आली. त्यात कोणाचाही विरोध झाला नाही. ज्या ठिकाणी मोजणीला विरोध होईल तेथील मोजणी सोडून पुढील मोजणी करण्यात येणार आहे.
- नितीन गवळी, तहसीलदार, सिन्नर

Web Title: Ultimately start measuring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.