पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:07 AM2018-08-24T01:07:19+5:302018-08-24T01:08:00+5:30

नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.

Ultimatum now for recovery of water | पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम

पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : ग्रामसेवकांना गिते यांनी खडसावले

नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.
थकीत पाणीपट्टीमुळे नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत झालेल्या आढावा बैठकीत सर्व ग्रामपंचायतींनी टप्प्याटप्प्याने थकीत पाणीपट्टी भरण्याचे मान्य केल्याने २४ आॅगस्टपासून सदरचा पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
या तिन्ही योजनांतून आतापर्यंत दीड कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे गेल्या १६ आॅगस्टपासून खंडित करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन पाणीपट्टी भरण्याच्या सूचना दिल्या. गावातील पाणीपट्टी वसूल करून जिल्हा परिषदेला भरण्याचे ग्रामसेवकांना बंधनकारक असूनदेखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पाणीपेट्टी थकीत राहण्याचे प्रमाण वाढले असल्याने यापुढे याबाबत ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.
नांदगाव व मालेगाव तालुके दुष्काळग्रस्त असल्याने टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी भरण्यासाठी मुदत देण्याचे सरपंच यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ टक्के थकबाकी भरून उर्वरित रक्कम विहित मुदतीत भरण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. तसेच १६ आॅगस्टपासून खंडित करण्यात आलेला पाणीपुरवठा शुक्र वार (दि. २४) पासून पूर्ववत सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता ए. एन. पाटील, उपअभियंता प्रकाश बोरसे उपस्थित होते.वसुलीसाठी विशेष नियोजनग्रामपंचायती नियमितपणे पाणीबिल भरीत नसल्याचा अनुभव लक्षात घेता गिते यांनी ग्रामसेवकांना जबाबादार धरण्याचे जाहीर केल्याने आता वसुलीसाठी जिल्हा परिषद सतर्क झाले आहे. यापूर्वी ग्रामसेवकांना आणि ग्रामपंचायातींनादेखील पाणीबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्थायीच्या सभेतही वादळी चर्चा झालेली होती परंतु ग्रामपंचायतींकडून अपेक्षित जबाबदारी घेतली जात नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर आता शासनाने वसुलीसाठी विशेष नियोजन केले आहे. पाणीबिल भरण्यासाठी आणखी एक संधी देतानाच टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे.

Web Title: Ultimatum now for recovery of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.