२० मार्चपर्यंत अल्टीमेटम : रस्त्यावरील फेरीवाल्यांविरुद्ध मोहीम तीव्र होणार ६६ हॉकर्स झोन कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:17 AM2018-03-10T00:17:56+5:302018-03-10T00:17:56+5:30
नाशिक : महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात २२५ ठिकाणी निश्चित केलेले हॉकर्स झोन येत्या २० मार्चपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला.
नाशिक : महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात २२५ ठिकाणी निश्चित केलेले हॉकर्स झोन येत्या २० मार्चपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत ६६ हॉकर्स झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत. दरम्यान, आक्षेपार्ह अशा सुमारे २५ हॉकर्स झोनबाबत समन्वयातून तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी हॉकर्स झोनची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी त्यांनी अतिक्रमण विभागाचा कार्यभार सांभाळणाºया उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्याकडेच हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कोणत्याही परिस्थितीत २० मार्चच्या आत निश्चित केलेल्या जागांवर हॉकर्स झोन कार्यान्वित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार, गेल्या दहा-बारा दिवसांपासून अतिक्रमण विभागाच्या वतीने सहाही विभागांत रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांपासून टपºया, दुकानांचे ओटे, शेड हटविण्याचेही काम सुरू आहे. महापालिकेने एकूण २२५ हॉकर्स झोन निश्चित केलेले आहेत. त्यातील ५९ प्रतिबंधित फेरीवाला क्षेत्र असून, १६६ मुक्त फेरीवाला क्षेत्र आहेत. २५ ठिकाणांबाबत आक्षेप आलेले आहेत. त्यामुळे जेथे आक्षेप नाहीत अशा जागांवर हॉकर्स झोन कार्यान्वित करण्याचे निर्देश त्या-त्या विभागीय अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, आतापर्यंत ६६ ठिकाणी हॉकर्स झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत. येत्या २० मार्चच्या आत उर्वरित हॉकर्स झोनही कार्यान्वित करण्यात येणार असल्याने त्या दृष्टीने अतिक्रमण विभागाने मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणीकृत हॉकर्स यांनी त्यांना ठरवून दिलेल्या जागांवर बसावे, रस्त्यावर व्यवसाय केल्यास कारवाई अटळ असल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी स्पष्ट केले आहे.
उड्डाणपुलाखालील भाजीविक्रेते हटविणार
नाशिकरोड येथील उड्डाणपुलाखालील जागा भाजीविक्रेत्यांनी व्यापली आहे. सदर भाजीविक्रेत्यांना के. एन. केला शाळेजवळील महापालिकेच्या मोकळ्या पटांगणावर जागा दिली जाणार असून, त्यासाठी आखणी करण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाखालील भाजीविक्रेत्यांना तेथून लवकरच हटविले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली असून, त्याठिकाणी सुशोभिकरणाचा प्रस्ताव आहे.