उमदेवार ‘शहेंशाह-ए-नासिक’च्या दरबारात

By admin | Published: February 18, 2017 05:51 PM2017-02-18T17:51:11+5:302017-02-18T17:51:11+5:30

महापालिका निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारदेखील निवडून येण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे.

Umadewar in the court of 'Shahhenshah-e-Nashik' | उमदेवार ‘शहेंशाह-ए-नासिक’च्या दरबारात

उमदेवार ‘शहेंशाह-ए-नासिक’च्या दरबारात

Next



नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारदेखील निवडून येण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. जुने नाशिक परिसरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान व ‘शहेंशाहे नाशिक’म्हणून प्रसिद्ध असलेले सुफी संत हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या दरबारात सर्वच उमेदवारांनी हजेरी लावून ‘दुवा’ मागितली.
निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, मतदरांच्या घरोघरी पोहचण्याबरोबरच विविध मंदिरांमध्ये तसेच दर्गाहमध्येदेखील उमेदवारांकडून हजेरी लावली जात आहे. शुक्रवारचे (जुमा) औचित्य साधत दुपारी नमाजपठणानंतर जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक १३ व १४मधील विविध पक्षांचे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले उमेदवार हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गामध्ये पोहचले होते. यावेळी उमेदवारांनी बाबांच्या मजारवर पुष्प अर्पण करून निवडणुकीत विजय प्राप्त व्हावा, यासाठी दुवा मागितली.
दुपारी अचानकपणे आपापल्या पक्षांच्या मफलरी गळ्यामध्ये घालून टोक्यावर गोल टोपी परिधान करत सर्वच उमेदवार बडी दर्गाच्या प्रांगणात आल्याने नागरिकांचे आकर्षण ठरले. या उमेदवारांचे राजकीय व्यासपीठ जरी वेगवेगळे असले तरी निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, सर्व उमेदवार बडी दर्गामध्ये एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Umadewar in the court of 'Shahhenshah-e-Nashik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.