उंबरदरी धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:03 PM2020-08-14T22:03:51+5:302020-08-15T00:22:43+5:30

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

Umbardari dam overflow | उंबरदरी धरण ओव्हरफ्लो

उंबरदरी धरण ओव्हरफ्लो

googlenewsNext

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणावर जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, तूर्त तरी योजनेचा पाणीप्रश्न मिटल्यात जमा आहे. उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने व म्हाळुंगी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हे पाणी थेट भोजापूर धरणात जात असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास भोजापूर धरणही ओव्हरफ्लो होण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: Umbardari dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.