उमराणे ग्रामहितवादी संघटनेतर्फे कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:03 AM2018-02-11T00:03:48+5:302018-02-11T00:42:17+5:30
उमराणे :महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त कला-सांस्कृतिक (गॅदरिंग) हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उमराणे : येथील स्व. रंगनाथ देवरे प्रणीत ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त सोमवारी (दि.१२) रात्री ८ वाजता कला-सांस्कृतिक (गॅदरिंग) हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे संघटनेचे प्रेरक स्व. रंगनाथ देवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या सोळा वर्षांपासून दरवर्षी अखंडपणे महाशिवरात्र यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षीही रामेश्वर महाराज यात्रोत्सवानिमित्त सोमवारी रात्री ८ वाजता हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या स्पर्धात्मक कार्यक्रमात मनोरंजन व समाजप्रबोधनासह विविध प्रकारचे कार्यक्रम स्पर्धकांकडून सादर केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह युवा-युवतींना आपल्या अंगी असणारे सुप्त कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे कलामंच उपलब्ध होत असून, लहान व मोठ्या गटातील स्पर्धकांना बक्षिसे दिली जातात. हा स्पर्धात्मक कार्यक्रम बघण्यासाठी मोठी गर्दी उसळते. त्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उमराणेसह परिसरातील कलाप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे यांनी केले आहे.