कराड मॅरेथॉनमध्ये उंबरठाण एक्सप्रेस विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:48 PM2018-10-02T17:48:01+5:302018-10-02T17:48:56+5:30

सुरगाणा : सातारा जिल्हयातील कराड येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत उंबरठाण येथील सुरज खोटरे याने प्रथम क्र मांक मिळविला. त्यामुळे क्रि डा क्षेत्रात सुरगाणा तालुक्याची मान उंचावली असून यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे. सुरज सध्या वाई येथे शिक्षण घेत आहे.

Umtarthan Express winner in Karad Marathon | कराड मॅरेथॉनमध्ये उंबरठाण एक्सप्रेस विजेता

कराड मॅरेथॉनमध्ये उंबरठाण एक्सप्रेस विजेता

googlenewsNext

सुरगाणा : सातारा जिल्हयातील कराड येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत उंबरठाण येथील सुरज खोटरे याने प्रथम क्र मांक मिळविला. त्यामुळे क्रि डा क्षेत्रात सुरगाणा तालुक्याची मान उंचावली असून यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे. सुरज सध्या वाई येथे शिक्षण घेत आहे.
सातारा जिल्हयातील कराड येथील एस.जी.एम.कॉलेज येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकून सात हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूचाही सहभाग होता. १८ वर्षाखालील स्पर्धेमध्ये एकून तीन हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १८ वर्षाखालील स्पर्धेमध्ये तालुक्यातील उंबरठाण येथील उंबरठाण एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा सुरज लक्ष्मन खोटरे याने या स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळवला. एस.जी.एम.कॉलेजचे प्राचार्य मोहन राजमाने यांच्या हस्ते सुरजला ५००१
रु पयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुरजचे वडील व्यवसायाने एक हॉटेल चालक असून कठीण परिश्रमातून त्यांनी सुरजचे शिक्षण सुरु ठेवेलेले आहे. यापुढेही तो या पेक्षा चांगली कामिगरी करेल असा सर्वांना विश्वास आहे. सुरज हा सातारा जिल्हयातील वाई येथे इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स आकादमी वाई येथे विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. 

Web Title: Umtarthan Express winner in Karad Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.