अन बिबट्या - कुत्र्यांमधे रंगला थरार..

By admin | Published: January 4, 2017 10:49 AM2017-01-04T10:49:02+5:302017-01-04T10:57:03+5:30

नाशिकजवळ दोन बहाद्दर कुत्र्यांनी बिबट्याचा प्रतिकार करत त्याला पळता भुई थोडी केली.

Un-leopard - throbbing dogs. | अन बिबट्या - कुत्र्यांमधे रंगला थरार..

अन बिबट्या - कुत्र्यांमधे रंगला थरार..

Next
>ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि.४ -  बिबट्या म्हटला कि कुत्रा ही त्याची आवडती शिकार म्हणून ओळखली जाते. मात्र दोन बहाद्दर कुत्र्यांनी बिबट्याचा प्रतिकार करत बिबट्याला झाडावर जाण्यास भाग पाडले अन कुत्रे व बिबट्या यांचा हा थरार खेडगाव येथे वस्तीवर एका तरुणाने बघितला अन त्याने गावांत ही बाब कळविली असता तरूण आणि वनखात्याच्या कर्मचा-यांनी बिबट्याला जिवंत पकडले.
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे श्री पंडितराव डोखळे यांचे  वृन्दावन फार्म शेताच्या जवळून वाहणाऱ्या नाल्याजवळ असलेल्या बोरीच्या झाडावर बिबट्यासारखा प्राणी शेजारून रस्त्याने जाताना परिसरातील तरुण सारंग डोखळे आपल्या शेतावर जात असताना त्यांच्या नजरेस पडले. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी तो गाडी आथंबवून ुभा राहिला असता दोन कुत्रे बिबट्यावर भुंकत असताना दिसले, तेवढ्यात बिबट्याने त्या कुत्र्यांच्या अंगावर उडी मारली.  
परिसरात बिबट्या आल्याची खात्री पटताच त्या तरूणाने तात्काळ आजूबाजूच्या शेतकरी व गावातील ग्रामस्थांना फोन करून माहिती दिली. काही वेळात परिसरातील शेतकरी जमा झाले तो पर्यंत बिबट्या परत बोरीच्या झाडावर जाऊन बसला. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करून वन अधिकारी  वाडेकर वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी यांच्याशी संपर्क साधला.  दिंडोरी येथील वनरक्षक  जब्बार पटेल यांना तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. तो पर्यंत परत बिबट्या झाडाजवळ असलेल्या गवताच्या शेतात कुत्र्याच्या मागावर जाऊन बसला. पण कुत्रे हे त्याला न घाबरता सारखे त्याच्यावर भुंकत होते. तो पर्यंत परिसरातील बहुसंख्य नागरिक व गावातील तरुणांनी घटनास्थळी पोचून शेताच्या आसपास मोठी साखळी केली.
बिबट्याल कोणतीही इजा न करता त्याला पकडण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन वनाधिका-यांनी केली. त्याचवेळेस  भगरे ,ग्रामपंचायत सदस्य  अनिल ठुबे ,सुनील शेटे , बाळासाहेब जेउघाले , पंडितराव डोखळे यांनी वनाधिकारी याच्याशी चर्चा करून  बाळासाहेब जेउघाले यांच्याकडे असलेले द्राक्ष बागेचे पक्षांपासून संरक्षन करणारी जाळी उपलब्ध करून दिली.  तर वनाधिका-यांनीही बिबट्याला पकडण्यासाठी परमोरी येथील पिंजरा मागवला. जाळी आल्यावर सर्व तरुणांनी ती जाळी पूर्ण शेतावर अंथरली व जमिनीलगत ती  पॅक करून सर्व तरुणांनी जाळीभोवती रिंगण केले.  ब-याच प्रयत्नांनतर बिबट्याला पकडण्यात यश मिळाले.

Web Title: Un-leopard - throbbing dogs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.