शहर बससेवा ताब्यात घेण्यास मनपा असमर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:27 AM2017-09-02T00:27:13+5:302017-09-02T00:27:38+5:30
महापालिकेने शहर बससेवा चालविली पाहिजे, हे खरे असले तरी सद्यस्थितीत एकूणच आर्थिक स्थिती पाहता बससेवा चालविण्यास महापालिका असमर्थ असल्याची स्पष्टोक्ती भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्यवहार्यता तपासून पूर्ण अभ्यासांतीच बससेवेचा निर्णय घेतला जाईल, असे सानप यांनी सांगितले.
नाशिक : महापालिकेने शहर बससेवा चालविली पाहिजे, हे खरे असले तरी सद्यस्थितीत एकूणच आर्थिक स्थिती पाहता बससेवा चालविण्यास महापालिका असमर्थ असल्याची स्पष्टोक्ती भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्यवहार्यता तपासून पूर्ण अभ्यासांतीच बससेवेचा निर्णय घेतला जाईल, असे सानप यांनी सांगितले.
महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घ्यावी यासाठी सातत्याने एसटी महामंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय, गेल्या काही दिवसात बसच्या फेºया अचानक कमी करून महामंडळाने महापालिकेवर दबावही वाढविला आहे. या साºया पार्श्वभूमीवर बससेवेबाबत भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. भाजपाच शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी बससेवेबाबत बोलताना सांगितले, महापालिकेला बससेवा ताब्यात घ्यायची आहे परंतु, सध्या ती वेळ नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती बससेवा चालविण्याइतपत सक्षम नाही. सद्यस्थितीत वीज, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठीही मनपाकडे पुरेसा निधी नाही. शहर बससेवा ताब्यात घेताना संबंधित कर्मचाºयांचे दायित्व महापालिकेला निभवावे लागणार आहे. एकूणच आर्थिक स्थिती पाहता ते शक्य वाटत नाही. त्यामुळे संपूर्ण व्यवहार्यता तपासूनच अभ्यासांती निर्णय घेतला जाईल. घाईघाईने निर्णय घेऊन मनपाचे नुकसान होऊ दिले जाणार नसल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले.