बाजार समिती उपसभापतिपदी कोठुळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:21 AM2018-08-30T00:21:19+5:302018-08-30T00:21:37+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापतिपदी युवराज कोठुळे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापतिपदी युवराज कोठुळे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती तुंगार यांनी काही महिन्यांपूर्वीच वैयक्तिक कारणास्तव उपसभापती पदाचा राजीनामा दिलेला होता. राजीनामा दिल्याने बाजार समिती उपसभापतिपद रिक्त होते. त्यासाठी बुधवारी सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. उपसभापतिपदासाठी युवराज कोठुळे यांनी दोन अर्ज सादर केले. अन्य कोणत्याही संचालकांचा अर्ज नसल्याने निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी देवीदास पिंगळे, चंद्रकांत निकम व जगदीश अपसुंदे हे संचालक गैरहजर होते.