कळवण नगरपंचायत विषय समित्यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:15 PM2019-01-23T22:15:11+5:302019-01-23T22:16:31+5:30
कळवण : कळवण नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगराध्यक्ष मयुर बहीरम, नियोजन, विकास सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष कौतिक पगार, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाळासाहेब जाधव तर पाणी पुरवठा व जलनि:स्सारण सभापतीपदी राष्ट्रवादीचे जयेश पगार स्वच्छता विषयक, वैद्यकीय आण िआरोग्य सभापतीपदी काग्रेसचे अतुल पगार, महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रंजना पगार तर उपसभापतीपदी भाजपच्या भाग्यश्री पगार यांची बुधवारी (दि.२३) विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशान्वये बुधवारी नगरपंचायतच्या नगरसेवकांची विशेष सभा तहसिलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली व कळवण नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यात कळवण नगरपंचायतीच्या स्थायीसह सहा समितीच्या सभापतीची निवड करण्यात आली.
कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष कौतिक पगार हे नियोजन आणि विकास समितीच्या पदसिद्ध सभापती असून सदस्यपदी साहेबराव वसंत पगार, दिलीप रामदास मोरे, रंजना गुलाब जगताप, अनिता सुनील जैन यांची निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब जाधव तर सदस्यपदी सुनीता पगार, अनुराधा पगार, रोहिणी महाले, भाग्यश्री पगार यांची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापतीपदी जयेश पगार तर सदस्यपदी सुनीता पगार, अनिता महाजन, साहेबराव पगार, दिलीप मोरे यांची निवड करण्यात आली.
स्वच्छता विषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापतीपदी अतुल पगार तर सदस्यपदी अनिता जैन, रंजना जगताप, अनिता महाजन, रोहिणी महाले यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना पगार, उपसभापतीपदी भाग्यश्री पगार तर सदस्यपदी अनुराधा पगार, सुरेखा जगताप, रंजना जगताप यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष मयुर बहीरम-
कळवण नगरपंचायतची स्थायी समीती गठीत करण्यात आली असून नगराध्यक्ष पदसिध्द सभापती असल्याने मयुर बहीरम सभापती असून सदस्य म्हणून कळवण नगरपंचायतच्या नियोजन, विकास सभापती तथा उपनगराध्यक्षा कौतिक पगार, सार्वजनिक बांधकाम सभापती बाळासाहेब जाधव तर पाणी पुरवठा व जलनि:स्सारण सभापती जयेश पगार स्वच्छता विषयक, वैद्यकीय आणि आरोग्य सभापती अतुल पगार, महिला व बालकल्याण सभापती रंजना पगार यांची निवड करण्यात आली.