महापालिका सफाई कर्मचारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी रद्द
By admin | Published: March 5, 2016 11:27 PM2016-03-05T23:27:45+5:302016-03-05T23:30:48+5:30
तक्रारींमध्ये तथ्य : उपनिबंधकांचे आदेश
नाशिक : द्वारका येथील महालक्ष्मी चाळीत उभारलेल्या महापालिका सफाई कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कारभारांबाबत आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी सदर गृहनिर्माण संस्थेची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत तक्रारदार सचिन परमार व मिलिंद जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, द्वारका येथे २००१ मध्ये सफाई कामगारांनी उपनिबंधकांकडे नोंदणी करून वसाहत उभी केली होती. एकूण ७४ सभासदांना त्यात घरे देण्यात येऊन त्याची वसुली सफाई कामगारांच्या मासिक वेतनातून करण्यात येत होती. परंतु काही कामगारांना वसुली होत असतानाही घरे देण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेच्या कारभाराविरुद्ध सचिन परमार, मिलिंद जगताप यांच्यासह २५ कामगारांनी उपनिबंधक सहकारी संस्था तक्रारी केल्या होत्या.