अनधिकृत बस थांबा हटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:18+5:302020-12-22T04:14:18+5:30
एमजी रोडवरील कोंडी कायम नाशिक: शहरातील अत्यंत गजबजलेला रस्ता म्हणून एम.जी. रोड ओळखला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक इमारती ...
एमजी रोडवरील कोंडी कायम
नाशिक: शहरातील अत्यंत गजबजलेला रस्ता म्हणून एम.जी. रोड ओळखला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक इमारती आहेत; मात्र पार्किंग रस्त्यावर केली जात असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच रस्त्यावर उभे राहणारे फेरीवाले यांच्यामुळेही वाहतुकीला अडथळा होतो. इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहने उभी न करता रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत भर पडते.
शहरातील बसथांबे दुरुस्तीची गरज
नाशिक: शहरात खासदार निधीतून आधुनिक असे बसथांबे तयार करण्यात आले होते; मात्र चोरट्यांनी थांब्याचे स्टील्सचे शीट तसेच पाईप्स चेारून नेल्यामुळे बसथांबे यांची दुरवस्था झालेली आहे. थांब्यांवर प्रवासी थांबत नसल्याचे थांब्याचा उपयोग होत नसला तरी त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण समोर येत असल्याने थांब्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
गांधीनगर उद्यानाचा कायापालट
नाशिक: गांधीनगर शासकीय वसाहतीत असलेल्या मोकळ्या मैदानावरील उद्यानाच्या जागेचा कायापालट होत आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी मंच तयार केला जात आहे. शिवाय जॉगिंगट्रॅक देखील तयार केला जात असल्याने या मैदानाचा कायापालट होणार आहे. सध्या येथील काम प्रगतिपथावर असून पुढीलवर्षी काम पूर्ण होणार आहे.