अनधिकृत बांधकाम करणारे बॅक फुटवर
By admin | Published: September 28, 2016 12:33 AM2016-09-28T00:33:27+5:302016-09-28T00:33:54+5:30
अनधिकृत बांधकाम करणारे बॅक फुटवर
नाशिक : महापालिकेने अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोहीम सुरू केली असून, त्यामुळे अशाप्रकारचे बांधकाम करणारे धास्तावले आहेत. पालिकेच्या या मोहिमेमुळे सुमारे पंधरा जणांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले.
पूर्व विभागातील मौजे वडाळा शिवारात अॅव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये व्ही नायडू, वडाळा शिवारातच सेक्रेड हार्ट शाळेजवळील ग्रीन पार्क रो- हाऊस येथील सादीक खान, नईम, इकबाल इनामदार आणि अखलाक खान यांनी आपले अतिक्रमण हटवले. अशाच प्रकारे नाशिकरोड येथील विहितगाव येथे रत्ना अपार्टमेंटमध्ये तारासिंग रूपीयाल यांनी अॅँगल शेड टाकून पाण्याच्या टाकीचे अनधिकृत बांधकाम केले होते. महामार्गावर चेतनानगर येथील सिद्धिविनायक रो-हाऊसच्या समोर राजेंद्र चौधरी, सुनील पैठणकर, विलास कड, पूरकर यांचे तर देवळाली स्कायलाईन टॉवर्स, बिटको पॉइंट येथील शिव वडापाव व आशा टी हाऊस आणि पाथर्डी फाटा येथील वहिदा शेख, पप्पू शेख, फारूक शेख आणि बखतुल्ला चौधरी यांनी अनधिकृत बांधकामे केल्याने महापालिकेने संबंधिताना नोटिसा बजावल्या होत्या. मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)