देवनदीवरील बंधाऱ्यातून विनापरवाना वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:52 AM2018-04-24T00:52:44+5:302018-04-24T00:52:44+5:30
तालुक्यातील वडांगळी येथील देवनदीच्या बंधायातून वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केल्यानंतर तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुमारे २४ ब्रॉस वाळूचा विनापरवाना उपसा केल्याचे आढळून आल्याची माहिती तलाठी व्ही. डी. कवळे यांनी दिली.
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील देवनदीच्या बंधायातून वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केल्यानंतर तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुमारे २४ ब्रॉस वाळूचा विनापरवाना उपसा केल्याचे आढळून आल्याची माहिती तलाठी व्ही. डी. कवळे यांनी दिली. सिन्नरच्या पूर्व भागातील देवनदीच्या बंधाºयातून वाळूचा बेकायदा उपसा केला जात असल्याची तक्रार बंधाºयाजवळील शेतकरी उत्तम शुक्लेश्वर खुळे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार व तलाठ्यांकडे केली होती. निवेदन देऊनही त्याचा उपयोग होत नसल्याचे खुळे यांचे म्हणणे होते. देवनदीपात्रातील बंधाºयाजवळील सर्व्हे नंबर २६ मधून शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याची तक्रार खुळे यांनी तलाठी कवळे यांच्याकडे मोबाइलवर मेसेज टाकून केली. त्यानंतर सोमवारी तलाठी कवळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने बंधाºयातील वरचा गाळ काढून त्याखाली विनापरवानगी वाळू उपसा केल्याचे दिसून आले. बंधाºयाच्या दोन्ही बाजूला सुमारे २४ ब्रॉस वाळूसाठा केल्याचे दिसून आले. तलाठी कवळे यांनी उत्तम खुळे, बापू खुळे, रवींद्र पवार, संजय गिते, बाळासाहेब खुळे यांच्या उपस्थितीत सदर वाळूसाठ्याचा पंचनामा केला आहे.