विनापरवाना माती वाहतुक, सहा वाहन धारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:49 PM2018-03-23T12:49:20+5:302018-03-23T12:49:20+5:30

नांदगाव-विनापरवाना माती व गाळ वाहतुक करतांना नांदगांव वनविभागाने एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर टॉलीसह जप्त करु न सहा वाहन धारकांवर भारतीय वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे .

Unauthorized Soil Freight, 6 Vehicle Holders Action | विनापरवाना माती वाहतुक, सहा वाहन धारकांवर कारवाई

विनापरवाना माती वाहतुक, सहा वाहन धारकांवर कारवाई

Next

नांदगाव-विनापरवाना माती व गाळ वाहतुक करतांना नांदगांव वनविभागाने एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर टॉलीसह जप्त करु न सहा वाहन धारकांवर भारतीय वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे .यामुळे वाळू व माती रेती अवैध तस्करी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. वनविभागाला मिळालेल्या माहितीवरु न वनपरीक्षेत्र अधिकारी विक्र म अहिरे, वनपाल हमीद शेख, सुनील खंदारे, वनरक्षक दिलीप उचाळे, नाना राठोड आदिंनी चिंचविहीर येथे धाव घेतली असता तेथील वनविभागाच्या हद्दीतुन विनापरवाना माती व गाळ वाहून नेण्याचे काम गुपचुपपणे सुरु होते. या वाहन धारकांकडे माती, ( पोयटा) गाळ वाहतूक करण्याचे कोणतेच परवाने नव्हते. दरम्यान, वनविभागाच्या मन्याड नदी, पांझण नदी, शाकंबरी व लहान मोठे नाले येथे विनापरवाना रेती मातीची चोरी होत असते. यावर अंकुश ठेवण्यास महसुल विभाग व वनविभाग कुचकामी ठरत आहेत, तर चिंचिवहीर येथील माती व गाळ वाहून नेण्याचे कामात वाहन धारकांत आपसातील समन्वयाचे अभावी या विनापरवाना माती व गाळ वाहतुकीचे बिंब फुटले. तरीसुद्धा वनविभागाला कारवाई करण्यासाठी तीन दिवस लागले. वाहन चालक तथा मालक देविदास रामराव कटारे, सुनिल मोरे चिंचिवहीर, बबन बुरकुल, बाळू बुरकुल, उत्तम बुरकुल, पंजाब इपर, भास्कर गिते, सर्व रा जळगांव बु यांच्यावर भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ कलम २६/(१) ग /ह नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहने वनविभागाने ताब्यात घेतली आहेत.

Web Title: Unauthorized Soil Freight, 6 Vehicle Holders Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक