बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:50 PM2017-10-28T23:50:56+5:302017-10-29T00:13:46+5:30

नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बस आणि अन्य वाहनांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकते.

 Unauthorized stop of private cars on buses | बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा

बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा

Next

संजय शहाणे ।
इंदिरानगर : नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बस आणि अन्य वाहनांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकते. पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या अपघातात अशाच प्रकारे एका बालकाचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटनेच्या पुनरावृत्ती होण्याची वाट तर वाहतूक पोलीस बघत नाही ना, असा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, रामनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, सराफनगर यांसह विविध उपनगरे आहेत. बहुतेक नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्याचा वापर करतात. अंबड औद्योगिक वसाहत व देवळाली कॅम्पला हा जवळचा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नागपूरच्या धर्तीवर म्हणजे एज टू एज रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु येथे घडले भलतेच, रुंद रस्त्यामुळे बेदरकारपणे रस्त्यावर धावणारी वाहने तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असणाºया मोटारींमुळे वेगळीच धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
सार्थकनगर बसथांब्यासमोरच एक प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. त्याठिकाणी सकाळी ८ वाजता, सकाळी ११च्या सुमारास आणि दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी येणाºया पालकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे दिवसभरातून तीन ते चार वेळेस वाहतुकीस रस्ता जणू काही बंदच होतो.  या कालावधीत मार्गक्रमण करणाºया अन्य वाहनधारक आणि पादचाºयांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी असा प्रश्न संतप्त नागरिक करू लागले आहेत. या विद्यार्थी वाहतूक करणाºयांच्या वाहनांमुळे लगतच असलेल्या अपार्टमेंट व सोसायटीतील रहिवाशांना बाहेर जाणेसुद्धा मुश्कील झाले आहे. तातडीने वाहतुकीस रस्ता मोकळा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (क्रमश:)

Web Title:  Unauthorized stop of private cars on buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.