त्र्यंबक नाका सिग्नलवर अनधिकृत थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:15+5:302021-01-08T04:42:15+5:30
रात्री उशिरापर्यंत लॉन्स सुरूच नाशिक : वडाळा नाका, तसेच अशोका मार्गवारील लग्न सोहळ्यासाठीचे हॉल आणि लॉन्स रात्री उशिरापर्यंत सुरू ...
रात्री उशिरापर्यंत लॉन्स सुरूच
नाशिक : वडाळा नाका, तसेच अशोका मार्गवारील लग्न सोहळ्यासाठीचे हॉल आणि लॉन्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या ठिकाणी होणाऱ्या लग्न सेाहळ्यासाठी गर्दीच्या नियमांचे उल्लंघन होत असून, वाहनेही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने, अन्य वाहनांना मार्ग काढणे कठीण होते.
गडकरी चौकातील दुभाजक धोक्याचे
नाशिक: सारडा सर्कलकडून गडकरी चौकात येणारी वाहने सीबीएसकडून येणाऱ्या वाहनधारकांना दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी या चौकात पहाटेच्या सुमारास कारचा अपघात होऊन काहीना जीव गमवावा लागला होता. दुभाजकातील दाट झाडेझुडपांमुळे पलीकडील वाहने दिसत नसल्याची तक्रार आहे.
कोणार्कनगर कॉर्नर चौकात कोंडी
नाशिक : कोणार्कनगर-दसक चौकातील उड्डाणपुलाखाली वाहतुकीची कोंडी नेहमीचीच समस्या बनली आहे. चौकात वाहनांची कोंडी होत असल्याने, वाहनांच्या लांबच लांग रांगा लागत आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी चौकात वाहतूक पोलीस नियुक्त नसल्यामुळे विस्कळीत वाहतुकीमुळे कोंडीत अधिकच भर पडते.
जूने सीबीएसला प्रवाशांची गैरसोय
नाशिक: जुने सीबीएस येथील बस स्थानकात बसप्लॅटफॉर्म आणि प्रवाशांसाठी बसण्यासाठीची जागा योग्य नसल्याने, भव्य स्थानकही बकाल झाले आहे. स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी सुसज्ज जागा करून दिली आणि समोरच्या जागेच बसेस उभ्या केल्या, तर प्रवाशांची सोय होऊ शकते. सध्या स्थानकाच्या समोर प्रवाशी उभे राहून बसेसचे फलक बघत असतात.
रेल्वे मालधक्का रस्ता धोकादायक
देवळाली गाव : देवळाली गाव राजवाडा येथील मालधक्का धोकादायक बनला आहे. रहिवासी क्षेत्रातून जाणारा हा मार्ग असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अरुंद रस्ता आणि त्याततच रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे, तर काही ठिकाणी रस्त्याचे रस्त्याचे साइडपट्टा खराब झाल्या आहेत. अशा मार्गावरून होणारी अवजड वाहतूक धोकादायक ठरत आहे.
स्टेट बँक चौकात अनधिकृत भाजीबाजार ना
शिकरोड : येथील रेजिमेंटलसमोरील मशीद रोड, तसेच स्टेटबँक चौक येथील अंतर्गत रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे गर्दी वाढत आहे. बाजारातील गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने या मार्गावरील बाजाराला आळा घालण्याची मागणी होत आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते, ग्राहकांची वाहने, तसेच स्थानिक दुकानदारांची वाहने, यामुळे या ठिकाणी गर्दी होत आहे.