इमारतींमधील  तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृत वापर ; अचानक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:37 AM2017-11-23T00:37:48+5:302017-11-23T00:39:55+5:30

शहरातील व्यावसायिक संकुलांसह मंगल कार्यालये, खासगी रुग्णालयांच्या तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृतपणे वापर करणाºयांना महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २२) अचानक पाहणी करत दणका दिला. पेठरोड, दिंडोरीरोड परिसरातील काही इमारतींची पाहणी केल्यानंतर त्यांनी शहरात पार्किंगच्या जागेचा बेकायदा वापर होणाºया इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा बजावण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले.

Unauthorized use of grounded parking in buildings; Suddenly survey | इमारतींमधील  तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृत वापर ; अचानक पाहणी

इमारतींमधील  तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृत वापर ; अचानक पाहणी

Next
ठळक मुद्दे शहरात पार्किंगच्या जागेचा बेकायदा वापर नोटिसा बजावण्याचे आदेश अभिषेक प्लाझा या संकुलाची पाहणी

नाशिक : शहरातील व्यावसायिक संकुलांसह मंगल कार्यालये, खासगी रुग्णालयांच्या तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृतपणे वापर करणाºयांना महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २२) अचानक पाहणी करत दणका दिला. पेठरोड, दिंडोरीरोड परिसरातील काही इमारतींची पाहणी केल्यानंतर त्यांनी शहरात पार्किंगच्या जागेचा बेकायदा वापर होणाºया इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा बजावण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले.  महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाºयांसमवेत बुधवारी दुपारी दिंडोरीरोडवरील एस्सार पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या अभिषेक प्लाझा या संकुलाची पाहणी केली असता, संकुलाच्या तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेचा वाणिज्यिक तसेच गुदाम म्हणून वापर होत असल्याचे निदर्शनास आले. पार्किंगच्या जागेत मोठ्या प्रमाणावर खतांचा-औषधांचा साठा आढळून आला. सदर संकुलात नगररचनाची परवानगी नसतानाही एका हॉलचा सर्रासपणे मंगल कार्यालय म्हणून वापर केला जात असल्याबद्दलही महापौरांसह नगररचना विभागाच्या अधिकाºयांनी आश्चर्य व्यक्त केले.  सदर मंगल कार्यालयामुळे वाहने थेट रस्त्यावर लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे महापौरांनी याबाबत इमारत मालकांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापौरांनी मधुर स्वीटच्या कॉर्नरवरील श्री हॉस्पिटलच्या इमारतीचीही पाहणी केली असता, सदर इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगचे दरवाजे बंद करून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहने थेट रस्त्यावर लागत असल्याचे चित्र दिसून आले.  हॉस्पिटलने सामासिक अंतरात केलेल्या अनधिकृत बांधकामांबाबतही कारवाईचे आदेश महापौरांनी दिले. रसिकलाल धारिवाल धर्मार्थ कॅन्सर हॉस्पिटलच्या इमारतीचीही महापौरांनी पाहणी केली असता सहा मीटर रस्त्यावर सदर हॉस्पिटलला परवानगी देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.  याशिवाय हॉस्पिटलच्या पार्किंगच्या जागेत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडेही त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष वेधले. संबंधितांना तत्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पाहणी दौºयात नगरसेवक अरुण पवार, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, घुले आदी सहभागी होते.

Web Title: Unauthorized use of grounded parking in buildings; Suddenly survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.