मुखेड गावात वायरमन नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 07:58 PM2018-09-15T19:58:41+5:302018-09-15T19:58:50+5:30
असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकºयांचे हे प्रयत्न तडीस जाऊ द्यायचे नाही या इराद्याने वीज वितरण कंपनी प्रयत्नशील आहे
मुखेड : असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकºयांचे हे प्रयत्न तडीस जाऊ द्यायचे नाही या इराद्याने वीज वितरण कंपनी प्रयत्नशील आहे येथील पत्रकार डि पिचे उदाहरण यासाठी प्रतिनिधीक ठरले असे आहे. गेल्या तीन मिहन्यांपासून ही डीपी जम्प जात असल्यामुळे सातत्याने नादुरु स्त राहत आहे.
या संदर्भात या ठिकाणी कार्यरत वायरमनला वारंवार सांगूनही काही एक उपयोग होत नाही. परिणामी या डीपीवरील अनेक शेतकर्यांचे उन्हाळ कांद्याचे महागडी कांद्याची रोपे जळून गेली. सोयाबीन, मका, बाजरी या पिकांना पाणी देता आले नाही. ऐन पावसाळयÞात अच्छे दिन शेतकºयांपासून पाणीपुरवठा न करता आल्यामुळे कोसो दूर राहिले. या कार्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेले कनिष्ठ अभियंता नाशिकवरून या कार्यालयाचा कारभार पाहतात. शेतकºयांसाठी ते कार्यालयात कधी उपलब्ध नसतात कायमस्वरूपी एकही कर्मचारी गावात निवासी नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी वायरमन म्हणून स्थानिक खासगी व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेले आहे.