अविश्वास बारगळला अन् विवाहही झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:50 AM2018-03-14T00:50:32+5:302018-03-14T00:50:32+5:30
इगतपुरी : तालुक्यातील कुर्णोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या सभेच्या दिवशीच (सोमवार दि़१२) उपसरपंच विलास जोशी यांचा विवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला होता.
कुर्णोलीचे उपसरपंच विलास जोशी यांच्या लग्नातील क्षण .
इगतपुरी : तालुक्यातील कुर्णोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या सभेच्या दिवशीच (सोमवार दि़१२) उपसरपंच विलास जोशी यांचा विवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला होता.
जोशी यांच्या विरूद्ध सरपंचांसह ३ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर अविश्वास ठरावावरील विशेष सभा झाली. मात्र अविश्वास ठराव दाखल करणाºयांसह स्वत: उपसरपंच अनुपस्थित राहिल्याने ठराव बारगळला.
इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी अविश्वास ठराव बारगळल्याचे घोषित केले. आता एक वर्षभर अविश्वास ठराव आणता येणार नसल्याने उपसरपंच विलास जोशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली येथील उपसरपंच विलास जोशी यांच्या विरोधात सरपंच वेणूबाई तेलम, ग्रामपंचायत सदस्य वाळू तेलम, कुसुम गटखळ, संगीता जोशी यांनी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. तहसीलदारांनी या ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि़१२) सभेचे आयोजन केले होते़ मात्र संबंधित कोणीही उपस्थित नसल्याने हा ठराव बारगळला़ यावेळी तहसील कार्यालयातील राजकुमार भालेराव, तलाठी सुनील शिवपुजे उपस्थित होते. उपसरपंच विलास जोशी यांचे सभेच्या दिवशीच लग्न असल्याने कुर्णोली येथे विवाहसोहळाही थाटामाटात संपन्न झाला.