हिंसाचाराविरोधात अभाविपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:51 AM2017-11-01T00:51:36+5:302017-11-01T00:51:42+5:30
केरळमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्या तसेच हिंसाचाराविरोधात अभाविपच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी (दि़३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़ ‘सेव्ह केरला- सेव्ह डेमाक्रॉसी’, ‘वंदे मातरम्‘, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या़ यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले़
नाशिक : केरळमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्या तसेच हिंसाचाराविरोधात अभाविपच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी (दि़३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़ ‘सेव्ह केरला- सेव्ह डेमाक्रॉसी’, ‘वंदे मातरम्‘, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या़ यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले़
केरळमध्ये अनेक वर्षांपासून संघ तसेच परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असूनही केरळ सरकारकडून कारवाई केली जात नाही़ या हत्येला केरळ सरकारचा पाठिंबा असून, त्याविरोधात मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले़ केरळमध्ये कम्युनिष्ट सरकारच्या २ वर्षांच्या कालावधीत १४ खून करण्यात आल्याचे महानगरमंत्री सागर शेलार यांनी सांगितले, तर केरळच्या क्रूर शासनाच्या राजवटीत महिला आणि तरुणांचे आयुष्य उद््ध्वस्त होत असल्याचे महानगर सहमंत्री शर्वरी अष्टपुत्रे यांनी सांगितले़ यावेळी महानगर सेवा आयामप्रमुख वैभव गुंजाळ, दुर्गेश केंगे, पवन प्रजापती, सुनील शिंदे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
केरळ सरकारच्या निषेधार्थ ११ नोव्हेंबर रोजी राजधानी तिरुवन्तंतपूरमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चात देशभरातील लाखो अभाविपचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे महानगर सहमंत्री रूपेश पाटील यांनी सांगत लोकशाहीचा केरळमध्ये लोकशाहीचा गळा आवळण्यात येत असल्याचा आरोप केला़