भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:59 AM2018-04-13T00:59:08+5:302018-04-13T00:59:08+5:30

नाशिक : भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमीच कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत आला आहे, यात शंका नाही; मात्र मागील काही महिन्यांपासून भाजपाचा कार्यकर्ता कोठेतरी अस्वस्थ झालेला जाणवत असल्याची खंत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली. त्यांचे मनोबल कमी झाले असून, पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, मी पक्षाच्या कोअर समितीची सदस्य म्हणून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिले.

Uncertainty among BJP workers | भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Next
ठळक मुद्देपंकजा मुंडे यांची खंतमनोधैर्य उंचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरजपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला फडणवीस यांच्याकडे अधिक वजनही

नाशिक : भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमीच कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहत आला आहे, यात शंका नाही; मात्र मागील काही महिन्यांपासून भाजपाचा कार्यकर्ता कोठेतरी अस्वस्थ झालेला जाणवत असल्याची खंत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली. त्यांचे मनोबल कमी झाले असून, पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, मी पक्षाच्या कोअर समितीची सदस्य म्हणून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिले.
भाजपाच्या पक्ष कार्यालयातील पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर, उपमहापौर प्रथमेश गिते, प्रदेशचिटणीस लक्ष्मण सावजी, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, सुनील बागुल उपस्थित होते.
यावेळी मुंडे म्हणाल्या, ‘अच्छे दिन’ येणार असा पक्षाने निवडणूकपूर्व नारा दिला आणि राज्याच्या व देशातील जनतेला अच्छे दिन आले आहे आणि पुढील दीड-दोन वर्षांत यापेक्षाही अधिक अच्छे दिन आल्याचा अनुभव जनतेला येणार आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य-केंद्र सरकारद्वारे विविध योजनांतर्गत राबविण्यात आलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. भाजपाचा कार्यकर्ता सुसंस्कृत व एक दर्जा असलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्या कार्यकर्त्याकडून तशाच पद्धतीचे वर्तन पक्षाला अपेक्षित असून, कार्यकर्त्यांनी संयम बाळगून पक्षाच्या प्रचार-प्रसारावर भर द्यावा, असे मुंडे यांनी यावेळी आवाहन केले.महाजन यांच्या शब्दाला वजननाशिक शहराला अधिक अच्छे दिन येणार आहे. कारण या शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दत्तक घेतले आहे. तसेच जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला फडणवीस यांच्याकडे अधिक वजनही आहे. त्यामुळे माझी फारशी गरज लागणार नाही, कारण एकापेक्षा एक दिग्गज या शहराकडे उपलब्ध असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाल्या. महाजन यांनी टाकलेला नाशिकच्या हिताचा शब्द मुख्यमंत्र्यांकडे खाली जाणार नाही असा ‘विश्वास’ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Uncertainty among BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा