राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:51 AM2018-11-15T00:51:00+5:302018-11-15T00:51:19+5:30

मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.

 Uncertainty in the MNS of Raj Thackeray's Northern Indians | राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

googlenewsNext

नाशिक : मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.  नाशिकमध्ये याच विषयावर सर्वाधिक आंदोलने पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांनी खासगीत याबाबत नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे हे कार्यक्रमास जातील, असे वाटत नसल्याचा आशावादही व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना नाशिकमध्ये मोठी साथ मिळाली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. नाशिक शहरातील सातपूर येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उधळून लावले तर शहरातील दगडफेकीत एका मराठी माणसाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असून, ते सध्या कोर्टाच्या वाºया करीत आहेत. असे असतानाच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याने नाशिकमधील लढवय्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.  मराठी माणसाची साथ शिवसेनेने सोडली मात्र मनसेने हा मुद्दा हाती घेतल्यानंतर नाशिककरांचा प्रतिसाद वाढला आणि पक्षाचे तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक निवडून आले होते. परंतु हा मूळ मुद्दा निघून गेला तर काय उपयोग असा प्रश्न कार्यकर्त्यांनी खासगीत केला आहे.
मराठी मुद्दा नव्हे अस्मिता
मनसेचा मराठीचा मुद्दा नसून अस्मिता आहे. त्यापोटीच मनसेने उत्तर भारतीयांपाठोपाठ गुजराथी वर्गाला दुखावले आहे. आता मराठी माणसांच्या भावना दुखावल्या तर पाठबळ कोणाचे मिळणार, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत करतो, कालांतराने अनेक पक्षांच्या आणि नेत्यांच्या भूमिका बदलतात. तसा बदल राज ठाकरे यांच्यात दिसतो आहे. महाराष्टचे नवनिर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याने यापूर्वी त्यांना उत्तर भारतीयांच्या रोषापोटी जे करता आले नव्हते ते करता येईल. पक्ष विस्तार करून जय उत्तर भारतीय तसेच पुढे जय गुजरातही म्हणता येईल.  - वसंत गिते, माजी आमदार, मनसे (सध्या प्रदेश उपाध्यक्ष भाजपा)

Web Title:  Uncertainty in the MNS of Raj Thackeray's Northern Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.