काका राज ठाकरेंवर पुतण्या आदित्य ठाकरेंची मात, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:49 AM2022-01-30T08:49:54+5:302022-01-30T08:50:30+5:30
Nashik News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती जपण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मदतीने शस्त्रसंग्रहालय साकारले खरे, मात्र त्याला अवकळा आल्यानंतर आता याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी स्मृती वनाची पायाभरणी केली आहे.
- संजय पाठक
नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती जपण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मदतीने शस्त्रसंग्रहालय साकारले खरे, मात्र त्याला अवकळा आल्यानंतर आता याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी स्मृती वनाची पायाभरणी केली आहे.
मुंबईत महापौर निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्यास राज यांनी नकारात्मक भूमिका घेतली. त्याच वेळी नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती जपण्यासाठी शस्त्रसंग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये हे साकारले. बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्मारक शस्त्रांचेच असल्याच्या भावना व्यक्त करीत त्यांनी जिवापाड जपलेली शस्त्रे या संग्रहालयासाठी दिली होती. या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. परंतु प्रसिद्धी तर झाली नाहीच, मनसेची सत्ता गेल्यानंतर स्मारकाला अवकळा आली.
सत्ता गेल्याने या संग्रहालयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप राज यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेने याच जागेत शिवसेनाप्रमुखांच्या नावाचेच स्मृती उद्यान साकारण्याची तयारी केली असून, त्याचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.