उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:10+5:302021-05-09T04:15:10+5:30

चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वापरलेले पी.पी.ई. किट, हँडग्लोज , औषधाचे खोके, जेवणाचे द्रोण, डिश व इतर कचऱ्याचे साम्राज्य दिसून ...

Uncleanliness in the premises of the sub-district hospital | उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छता

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छता

googlenewsNext

चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वापरलेले पी.पी.ई. किट, हँडग्लोज , औषधाचे खोके, जेवणाचे द्रोण, डिश व इतर कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले तर दुसरीकडे सफाई कामगारच नसल्याने व हे काम करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने रुग्णांचे व त्यांच्या नातलगांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सफाई कामगार नेमणुकीसाठी नव्याने जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, त्यास कुणीही प्रतिसाद दिला नाही तर कोविड सेंटरमध्ये सफाईचे काम करण्यास तयार नसल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान कोविड सेंटरला सफाईची सेवा देणाऱ्या पुरवठादारांच्या अडचणी प्रशासनाने समजून घेऊन या अडचणीच्या कामात काम करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या आठवड्य़ात स्वच्छतागृहाची साफसफाईच झाली नसल्याने कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. खांटाची , मुख्य हॉलची व स्वच्छतागृहाची स्वच्छता झाली नसल्याने रुग्णांना जेवणही जाईनासे झाले होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वच अधिकाऱ्यांची बैठक चांदवडच्या विश्रामगृहावर दोन- तीन दिवसांपूर्वीच आ. डॉ. राहुल आहेर यांनी घेतली. त्यानंतर एक दोन दिवस परिस्थिती बरी झाली, असे वाटत असतानाच पुन्हा घाणीचे साम्राज्य आढळून आले आहे.

इन्फो

जैविक कचऱ्यामुळे धोका

शनिवारी (दि.८) मे रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अक्षरश: हँडग्लोज, पी.पी.ई. किट व दवाखान्यातील वापरलेले औषधाचे खोके, जेवणाचे डिश, द्रोण परिसरात अस्ताव्यस्त्य अवस्थेत आढळून आले. यात जैविक कचराही असल्याने तो आरोग्याला घातक आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने रुग्णांच्या नातलगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक हे कोरोनाने आजारी आहेत. तर सर्वच डॉक्टर, कर्मचारी या घाणीमुळे हैराण झाले आहेत.

फोटो - ०८ चांदवड हॉस्पिटल

चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पसरलेले घाणीचे साम्राज्य.

===Photopath===

080521\08nsk_37_08052021_13.jpg

===Caption===

फोटो - ०८ चांदवड हॉस्पिटलचांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पसरलेले घाणीचे साम्राज्य.

Web Title: Uncleanliness in the premises of the sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.