नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:00 AM2020-03-01T00:00:45+5:302020-03-01T00:01:29+5:30

नाशिक : नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उत्कंठा लागलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक अखेर अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी पाच इच्छुकांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. कार्यकारिणी बिनविरोध झाल्यानंतर आता ४ मार्चला परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची व निमंत्रित सदस्यांची निवड होणार आहे.

Uncontrolled election of drama council | नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध

बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांच्या नावाचे प्रमाणपत्र रवींद्र कदम यांना प्रदान करताना निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत बेणी. समवेत सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शाहू खैरे, पीयूष पाणबुडे, उमेश गायकवाड, सुनील परमार, प्रशांत जुन्नरे, प्रवीण कांबळे, अभय ओझरकर, विजय शिंगणे, राजेंद्र जाधव, विशाल जातेगावकर, ईश्वर जगताप, विजय रावळ, प्रकाश साळवे आदी.

Next
ठळक मुद्दे ४ मार्चला परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची व निमंत्रित सदस्यांची निवड होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उत्कंठा लागलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक अखेर अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी पाच इच्छुकांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. कार्यकारिणी बिनविरोध झाल्यानंतर आता ४ मार्चला परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची व निमंत्रित सदस्यांची निवड होणार आहे.
कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रि या पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत बेणी यांनी नाट्य परिषद, नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली व निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी प्रवीण कांबळे, वरुण भोईर, अदिती मोराणकर, प्रदीप पाटील, चंद्रकांत जाडकर यांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली.कालापव्यय आणि खर्च यांचा विचार करता परिषदेच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली. हे सदस्यांमधील आपसातील असलेला विश्वास दर्शवितो आहे. ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व बिनविरोध कार्यकारिणी निवडण्यास सहाय्य केले त्यांचेही आगामी काळात मार्गदर्शन घेण्यात येईल. लवकरच शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे, त्यासाठी नाशिकमध्ये करावयाच्या कार्यक्र मांची जबाबदारी नवीन कार्यकारिणीवर आहे.
- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषदकार्यकारिणीचे सदस्य
रवींद्र कदम, शाहू खैरे, डॉ. अनिरु द्ध धर्माधिकारी, ईश्वर जगताप, प्रशांत जुन्नरे, अभय ओझरकर, शिरीष गर्गे, उमेश गायकवाड, राजेंद्र जाधव, विशाल जातेगावकर, राजेश जाधव, सुनील ढगे, सुनील परमार, पीयूष पाणबुडे, राजेश भुसारे, विनोद राठोड, विजय रावळ, विजय शिंगणे, प्रकाश साळवे.नाट्य परिषदेच्या जवळपास दीड हजार सदस्यांमधून १९ सदस्यांची शाखेच्या कार्यकारिणीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवीन सदस्यांनी जबाबदारीपूर्वक काम करून विश्वास सार्थ ठरवायचा आहे. नवीन सदस्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून रंगमंचाची सेवा करण्यात त्यांच्या पदाचा उपयोग करावा.
- सुनील ढगे, सचिव, नाट्य परिषद

Web Title: Uncontrolled election of drama council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.