पोलीस बेलगाम, नाशिककरांना फुटला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:34 PM2020-05-04T22:34:20+5:302020-05-04T22:55:38+5:30

नाशिक : शहरात येणाऱ्या घुसखोरांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याची ओरड होत असताना सोमवारी (दि.३) आणखी एक बाधित सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

 Uncontrolled police, Nashik residents break out in sweat | पोलीस बेलगाम, नाशिककरांना फुटला घाम

पोलीस बेलगाम, नाशिककरांना फुटला घाम

Next

नाशिक : शहरात येणाऱ्या घुसखोरांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याची ओरड होत असताना सोमवारी (दि.३) आणखी एक बाधित सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. लपून छपून आणि वैद्यकीय उपाचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या संपर्र्कात आल्याने एका वैद्यकीय व्यावसायिकालाच कोरोनाची लागण झाल्याची महापालिकेची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर संबंधित बाधित रुग्णाच्या घराजवळील म्हणजेच जनरल वैद्यनगर परिसर सील करण्यात आला आहे.
तथापि, आतापर्यंत नाशिक शहरात सापडलेल्या रुग्णांपैकी अवघे दोन ते तीन मूळ शहरातील असून, बाकी बाहेरील तर आहेच, शिवाय अशा बाहेरील व्यक्तींमुळे स्थानिकांना संसर्ग वाढल्याचे आढळले आहे. सीमेवरील पोलीस यंत्रणा शिथिल झाल्याने आणि प्रसंगी वेगवेगळी कारणे सांगून शहरात शिरत असल्याने नाशिककरांना मात्र घाम फुटला आहे.
नाशिक शहरात सोमवारी (दि. ४) एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील रुग्ण संख्या वाढून सतरा झाली आहे. मालेगाव कोरोनाचा हॉट स्पॉट, तर नाशिक शहर नियंत्रित स्थितीत असताना आता मात्र शहरातदेखील धोका वाढला आहे. केवळ यामुळेच नाशिक शहर रेड झोनमध्ये गेले आहे. या प्रकारामुळे नाशिककर अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे मुंबई-पुण्याजवळील लगतचे शहर असताना शहरातील स्थिती नियंत्रित असल्याने महापालिकेच्या यंत्रणेचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे शहराच्या सीमा सील करण्याची जबाबदारी पोलिसांची असतानाही सर्वच ठिकाणी नियंत्रण ढासळल्याचे दिसत आहे. सीमा सील असतानाही शहरात परप्रांतीयांचे जत्थे शिरत असून, नाशिकमार्गे जाताना ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याने धोकादायक स्थिती आहे. मालेगावबरोबरच अन्य ठिकाणांहून येणाऱ्यांची कोणतीही विचारपूस केली जात नाही, असा महापालिकेच्या यंत्रणेला संशय आहे. मुंबई आणि पुण्यावरून येणाºयांनाही सहज प्रवेश मिळू लागल्याने त्याचादेखील फटका सिडको-अंबड लिंकरोड परिसरातील कोरोना बाधितांच्या प्रकरणात बसल्याचे दिसले आहे.
----
१४२ नमुन्यांच्या अहवालांकडे लक्ष
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने त्यांच्या घराच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. नव्या सहा प्रतिबंधित क्षेत्रातील दोन हजार ४६९ घरांमधील ९ हजार ३७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. शहरात अलीकडे आढळलेल्या सहा बाधितांच्या संपर्कातील १४२ नागरिकांचे घसा स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.
---------------
४५ रुग्णांवर उपचार
नाशिक शहरात आजमितीस १७ कोरोनाबाधित आढळले असले तरी कोरोनाबाधित शहरात येऊन उपचार घेत असलेल्यांची संख्या ४५ असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी येणाºयांबाबतही आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title:  Uncontrolled police, Nashik residents break out in sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक