भोजापूर धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:30 AM2018-08-24T00:30:11+5:302018-08-24T00:30:11+5:30

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर तालुक्याचा पूर्वभाग अद्याप कोरडाठाक असल्याने पूरपाणी दुशिंगपूर व फुलेनगर बंधाºयात सोडण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

undefined | भोजापूर धरण ओव्हरफ्लो

भोजापूर धरण ओव्हरफ्लो

Next
ठळक मुद्देदिलासा : सिन्नरच्या पूर्व भागात पूरपाणी सोडण्याची मागणी


सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण गुरुवारी ओसंडून वाहू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर तालुक्याचा पूर्वभाग अद्याप कोरडाठाक असल्याने पूरपाणी दुशिंगपूर व फुलेनगर बंधाºयात सोडण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने ठाणगाव जवळील उंबरदरी धरण १५ आॅगस्ट रोजी भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सुमारे महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्याने भोजापूर धरणात १७ जुलैपर्यंत ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १६ आॅगस्टपासून पश्चिम पट्ट्यात पावसाचा पुन्हा जोर वाढल्यामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात पुन्हा एकदा १७ आॅगस्टपासून नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणात येणारी पाण्याची आवक दररोज वाढत असल्याने भोजापूर धरण भरण्याकडे शेतकºयांचे लक्ष लागले होते.
अवघ्या पाच दिवसात धरणात २०० दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. त्यामुळे ३६१ क्षमतेच्या भोजापूर धरणात बुधवारी (दि. २२) सकाळपर्यंत ३०४ दशलक्ष घनफूट
पाणी म्हणजे ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. बुधवारी दिवसभर व रात्री म्हांळुगी नदीद्वारे धरणात पाण्याची चांगल्या प्रमाणात आवक झाल्याने धरण गुरुवारी (दि. २३) रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे.



तर सांडव्यातून सुमारे १०० क्युसेक वेगाने पाणी पडत होते. चास शिवारात दुपारनतंर पाणी पोहचले होते. भोजापूर धरण भरल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. या परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून या वर्षी तब्बल लाभ क्षेत्रातील शेतक री करत आहे.भोजापूर धरण उशिरा का होईना पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसाच्या जोरावर धरण भरले असले तरी पूर्व भागात विशेषत: वावी परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. वावीसह पूर्व भागात अद्यापही दुष्काळसदृश परिस्थिती
आहे.
भोजापूर धरणातून दुशिंगपूर व फुलेनगर या बंधाºयात पूरपाणी सोडण्यासाठी चाºयांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुशिंगपूर व फुलेनगर हे दोन्ही बंधारे कोरडेठाक आहेत. भोजापूरच्या पूरपाण्याने पूर्व भागातील या बंधाºयांत पाणी सोडल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल व परिसरातील विहिरींना पाणी उतरेल. त्यामुळे पूरपाणी पूर्व भागात सोडण्याची मागणी होत आहे.

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण