सिन्नरला शेतीमाल तारण कर्ज योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:27 PM2018-10-06T16:27:42+5:302018-10-06T16:28:19+5:30

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी दिली.

undefined | सिन्नरला शेतीमाल तारण कर्ज योजना

सिन्नरला शेतीमाल तारण कर्ज योजना

googlenewsNext
ठळक मुद्देओला शेतमाल तारण ठेवला जाणार नाही

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी दिली. सिन्नर येथे गोदामांची उपलब्धता नसल्याने शेजारच्या संगमनेर तालुक्यातील वखार महामंडळाच्या गोदामात धान्य ठेवून शेतकºयांना या योजनेचा लाभ घेता येईल. दरम्यान सिन्नर बाजार समितीकडे वावी उपबाजार आवारात असलेले ५०० मेट्रीक टनाचे गोदाम बाजार समितीने शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत किमान आधारभुत किंमतीने मका खरेदीसाठी तहसीलदार सिन्नर यांच्याकडे यापुर्वी दिलेले आहे. यंदाच्या वर्षात त्या गोदामाचा वापर केला जाणार आहे. वखार महामंडळाचे गोदाम मुसळगाव औद्योगिक वसाहतीत असल्याकारणाने शेतमालाच्या साठवणुकीसाठी वापरता येणार नाही. ही बाब लक्षात घेवून जवळील संगमनेर तालुक्यातील वखार महामंडळाच्या गोदामाचा आधार घेण्यात आला आहे. तालुक्यातील या योजनेमध्ये भाग घेणाºया इच्छुक शेतकºयांनी संगमनेर येथील वखार महामंडळाच्या गोदामाच्या पावतीवर ६ टक्के व्याज दराने १८० दिवसांकरीता तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, करडई, सुर्यफुल, सुपारी, गुळ, वाघ्या घेवडा, काजु बी या शेतमालाच्या तारणावरचालू बाजार भावाने किमतीच्या ७५ टक्के किंवा हमीभावाच्या ७५ टक्क्यांपेक्षा जी कमी रक्कम असेल ती कर्ज म्हणून मिळेल. तसेच ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालाच्या तारणावर चालू बाजारभावाने किमतीच्या ५० टक्के किंवा प्रति क्विंटल ५०० रूपये यापैकी जी कमी रक्कम असेल तितके कर्ज उपलब्ध होईल. शेतकºयांनी शेतमाल तारणकर्ज योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्यावतीने सचिव विजय विखे यांनी केले. सदर योजनेचा लाभ घेणाºया शेतकºयांनी शेतकºयाचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता व गावाचे नाव, आधार कार्ड, बॅँक पासबुक, सातबारा उतारा, शेतकर्जाचा संपर्क क्रमांक, उताºयावर पीक पाणी नोंद आवश्यक आहे. चौकट- शेतमाल तारण कर्ज शेतमाल तारण कर्जासाठी काही अटी व शर्ती ठरवून दिलेल्या आहेत. माल मोजून प्रत पाहून चांगल्या प्रतीचा माल ठेवून पावती दिली जाईल, खराब/कमी प्रतीचा/बोगस शेतमाल तारण ठेवला जाणार नाही, ओला शेतमाल तारण ठेवला जाणार नाही, शेतमाल अयोग्य प्रतीचा अथवा खराब असल्यास ठेवला जाणार नाही. दरम्यान संगमनेर वखार महामंडळातील साठा अधिक्षक एम. पी. पिसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, नाशिक जे.एस. आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर ए. सी. शिंदे, उपसचिव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी