इगतपुरी तालुक्यातील एकलव्य शाळेची जिल्हास्तरीय निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 05:07 PM2018-10-15T17:07:29+5:302018-10-15T17:08:26+5:30
इगतपुरी : इगतपुरी आदिवासी तालुक्यातील एकलव्य रेसिडेंशल स्कूल, पिंप्री सदो येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत उत्तम खेळ सादर केल्याने त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
इगतपुरी : इगतपुरी आदिवासी तालुक्यातील एकलव्य रेसिडेंशल स्कूल, पिंप्री सदो येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत उत्तम खेळ सादर केल्याने त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या इगतपुरी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत एकलव्य रेसिडेंशल स्कूल पिंप्री (सदो) येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धा गाजवत तालुकास्तरावर जवळपास सर्वच खेळामध्ये चांगले प्रदर्शन करून प्रथम, द्वितीय, तसेच तृतीय क्र मांक पटकावले. विजेता खेळाडू अनुक्र मे शंभर, दोनशे ,तीनशे,चारशे, पंधराशे, तीनहजार मीटर धावणे, चालणे, लांब उडी, चारशे मीटर रिले आदी मैदानी स्पर्धेत मंदाराणी पावरा, मुन्नी पवारा, रविना वाघ, उज्वला पाडवी, प्रियांका साबळे, ललिता गायकवाड, लता ससाणे, अजय ठाकरे, किरण पवार, पार्थ वळवी, लीलाधर गावित, बन्सी वसावे, सागर पवारा, भूषण कडाळी, आकाश पवारा, कलसिंग बारेला, मच्छिंद्र भोये, मनोज गावित, प्रवीण गायकवाड, भारत आगिवले आदींनी प्रथम द्वितीय क्र मांकाची चांगली कामगिरी करत जिल्हास्थरावर मजल मारली.
पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर धडक बघताच तालुका क्र ीडा अधिकारी विजय सोनावणे यांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक एस. डी. महाले यांचे कौतुक केले. तर पुढील स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रा. बी. डी. चौधरी, टी. वाय. महाले, एस. जी. पाटील, श्रीमती आर. वाय. महाले, एम. आर. सोनटक्के व एम. ए. पाटील आदी उपस्थित होते. क्र ीडाशिक्षक एस. डी. महाले यांचे मार्गदर्शन लाभले.