एकलहरे केंद्रातील तीन्ही निर्मिती संच कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:53 PM2019-05-15T18:53:39+5:302019-05-15T18:54:09+5:30
कोळशाची उपलब्धता, वीजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीन पैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावँट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक
लोकमत न्युज नेटवर्क
एकलहरे : मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादीत होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णीक वीज केंद्राचे तीनही संच पुर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले असून, त्याद्वारे राज्याची विजेची मागणी पुर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरे येथील एकच संच कार्यान्वित करण्यात आला होता.
कोळशाची उपलब्धता, वीजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीन पैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावँट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक ४ व ५ मधून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन सुरु ठेऊन संच क्रमांक ३ स्टँडबाय ठेवण्यात आला होता. मात्र आता ऊन्हाळ्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे एकलहरे येथील स्टँडबाय ठेवलेला संच क्रमांक तीन देखील सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे सद्या एकलहरेचे तीनही संच पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात संचालक संचलनाचे पाच सूत्री कार्यक्रमानुसार निरनिराळ्या धेय धोरणांची अंमलबजावणी, नवनवीन संकल्पना, संवादात्मक कार्यक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येते,त्यामुळे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरु केल्यामुळे सर्व कधिकारी अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.