गंगापूर, सोमेश्वर, त्र्यंबक परिसरात पर्यटनास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:07 PM2019-08-04T14:07:32+5:302019-08-04T14:08:37+5:30

नाशिक : गंगापूर बॅकवॉटरसह धरण परिसरात पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. या भागात कोणी पर्यटक फिरताना आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून ...

undefined | गंगापूर, सोमेश्वर, त्र्यंबक परिसरात पर्यटनास बंदी

गंगापूर, सोमेश्वर, त्र्यंबक परिसरात पर्यटनास बंदी

Next
ठळक मुद्दे‘संडे’ची सुटी घरी कुटुंबासमवेत साजरी करावी

नाशिक : गंगापूर बॅकवॉटरसह धरण परिसरात पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. या भागात कोणी पर्यटक फिरताना आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे येथे पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. पहिने-पेगलवाडी रस्त्यावरील नेकलेस फॉल, काचुर्ली शिवारातील दुगारवाडी, हर्षेवाडीयेथील हरिहरगड भागात पर्यटकांना वनविभागाने मज्जाव केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षकांना तैनात करण्यात आले आहे.
नाशिक शहरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून गोदेला महापूर आला आहे. तसेच गंगापूर धरण ९३ टक्के भरल्याने दुपारी १ वाजता धरणाचा विसर्ग सुमारे ४५ हजार ४८६पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे गोदावरी धोक्याच्या पातळीपेक्षा कितीतरी पटीने वर वाहू लागली आहे. यामुळे सोमेश्वर मंदिरसह गंगापूर गावाजवळील दुधस्थळी (सोमेश्वर) धबधब्याच्या परिसरातदेखील बंदी घालण्यात आली आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक येथे तैनात करण्यात आले आहे. नाशिककरांनी ‘संडे’ची सुटी घरी कुटुंबासमवेत साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.