निºहाळेत उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:42 PM2019-06-05T23:42:44+5:302019-06-05T23:45:00+5:30
निºहाळे : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागातर्फे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्रमाला सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथून प्रारंभ झाला. बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
निºहाळे : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागातर्फे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्रमाला सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथून प्रारंभ झाला. बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
येथील श्रीराम मंदिरासमोरील चौकात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सरपंच अण्णा काकड होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे व वावी
कृषी मंडल अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पंधरवडा अभिायान राबविले जाणार आहेत.
यावेळी मंडळ अधिकारी पाटील यांनी शेतकºयांना अध्यावत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पादन कसे वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
युवामित्रचे सुधीर मोराडे यांनी कृषी उत्पन्नवाढीसाठी योग्य बियाणाची निवड आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगत मका बियाणाच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कृषी सहाय्यक विजय शेलार यांनी कपासीतील गुलाबी बोंड अळीचा बंदोबस्त तसेच मक्यावरील लष्करी अळी, पीक विमा योजना, सुलभ सिंचन योजना, दुष्काळी परिस्थितीतील फळबागा वाचवण्यासाठी करावयाचा उपाय-योजना, आरोग्य पत्रिका, माती परिक्षण तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी बाळासाहेब शिंदे, दत्तू वाघ, अशोक थोरात, राबसाहेब काकड, कैलास भागवत, कांता केकाणे, नंदराम काकड, देवीदास वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.