उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:44 AM2018-04-21T00:44:58+5:302018-04-21T00:44:58+5:30

 Under the flyover, the eagle sellers have their encroachment | उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण

उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण

googlenewsNext

इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गजरे विक्र ेत्यांचा अनधिकृत डेरा केव्हा उठणार, का कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे, असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून असे चार रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला आहे.  तेथेच अंघोळ, स्वयंपाक, झोप, मलमूत्र विसर्जन आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरे विक्र ेत्यांच्या अतिक्र मणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. महापालिकेच्या वतीने दोन वेळेस अतिक्र मण निर्मूलन मोहिमेने कारवाई करूनसुद्धा त्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे थे’ होत आहे. त्यामुळे लहान- मोठे अपघातही दररोज घडत असून, जीवितहानीची वाट बघत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title:  Under the flyover, the eagle sellers have their encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक