उड्डाणपुलाखालील परिस्थिती ‘जैसे-थे’

By admin | Published: September 9, 2016 01:16 AM2016-09-09T01:16:11+5:302016-09-09T01:16:21+5:30

यंत्रणेची डोळेझाक : असुरक्षित संसार ‘हायवे’वरच

Under the flyovers 'as-there' | उड्डाणपुलाखालील परिस्थिती ‘जैसे-थे’

उड्डाणपुलाखालील परिस्थिती ‘जैसे-थे’

Next

नाशिक : मुंबई नाका ते वडाळानाकादरम्यान महामार्गावर गजरा विक्रेत्यांची आठ ते दहा कुटुंबांचा संसार दुभाजकावरच कायम असून, याकडे यंत्रणेची डोळेझाक होत आहे. हायवेवरील असुरक्षित संसाराचा मुद्दा प्रकाशझोतात येऊनदेखील त्याबाबत महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच जबाबदार यंत्रणेने डोळेझाक करणे पसंत केले आहे.
शहरामधील विविध सिग्नलवर गजरे विक णारी लहान मुले, महिला, युवक यांचा रात्री व दिवसाही मुक्काम असतो तो मुंबईनाका परिसरातील उड्डाणपुलाखाली थेट महामार्गाच्या दुभाजकावरच. यामुळे या गजरा विक्रेत्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विक्रेत्यांनी घरावर होणारा खर्च किंवा शहर व परिसरात झोपड्या टाकण्याची निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे निवाऱ्याचा ‘शॉर्टकट’ हायवेवर शोधला आहे. झोक्यात झोपणाऱ्या लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत या विक्रेत्यांच्या कुटुंबात सदस्य आहेत; मात्र त्याचे कु ठलेही गांभीर्य विक्रेत्यांना नाही. दुभाजकावरच या विक्रेत्यांचा दिवस उगवतो आणि रात्रही सरते. महामार्गावरून भरधावपणे जाणाऱ्या वाहनांच्या आवाजात ही मंडळी बिनधास्तपणे ‘निद्रिस्त’ असते.
रस्त्यालगतच्या पदपथांवर झोपणारे किंवा दुभाजकांवर झोपलेल्या भिखारींचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये यापूर्वी घडल्या आहेत. त्या घटनांची पुनरावृत्ती या ठिकाणीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसा-रात्री वाहनचालक भरधावपणे महामार्गावरून वाहने नेतात. महामार्गाच्या दुभाजकांवर झोपणे हे धोकेदायक आहे. रात्रीच्या वेळी हा धोका कित्येकपटीने वाढतो; मात्र याची कुठलीही जाणीव या गजराविक्रेत्यांना नाही किंबहुना असूनही नसल्यासारखे हे लोक भासवत आहे. दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच सरकारी शासकीय प्रशासनाच्या भूमिकेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटतील यात शंका नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Under the flyovers 'as-there'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.