माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सटाण्यात ११ पथकांमार्फत सर्वेक्षण मोहिम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 04:46 PM2020-09-21T16:46:53+5:302020-09-21T16:49:33+5:30
सटाणा : येथील पालिका क्षेत्रातील कर संकलनाच्या ११ क्षेत्रनिहाय सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले असुन प्रत्येक पथकात १ पर्यवेक्षक, २ प्रगणक यांची नेमणुक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष सुनिल मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, यांनी सर्वेक्षण मोहिमेस सुरवात केली. मोहीमेस सुरवात करतांना नगराध्यक्षांनी पालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवकांसह सर्व माजी नगरसेवकांना व स्वयंसेवकांना या मोहिमेत सर्व नागरीकांचा सहभाग नोंदवुन लवकरात लवकर सटाणा शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सर्वेक्षण मोहिमेची सुरवात श्मित मदनलाल अजमेरा यांच्या कुटुंबापासुन करण्यात आली. या प्रसंगी प्र स्वच्छता निरिक्षक माणिक वानखेडे, नगररचना सहायक धनंजय अहिरे, कर निरिक्षक कैलास चव्हाण, लेखापाल निलेश बोरसे, अंतर्गत लेखापरिक्षक किरण अहिरे, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संगणक अभियंता गौरव जोपळे, सहा. कर निरिक्षक निषाद सोनवणे, सहा. कर निरिक्षक निवृत्ती कुवर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, वाहन विभाग प्रमुख संदीप पवार यांचेसह पथकातील प्रगणक दुर्गेश गायकवाड, ईस्माईल शेख, रमाकांत पाटील, विजय सोनवणे, रामदास सोनवणे, सागर मोरे, धनंजय सोनवणे, उध्दव जोशी आदी उपस्थित होते.