१९ एप्रिलपासून पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:57+5:302021-04-10T04:14:57+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने हिवाळी २०२० व उन्हाळी २०२१ लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने हिवाळी २०२० व उन्हाळी २०२१ लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षांच्या तीसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावीधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२०परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात औषधनिर्माणशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्याही (सीसीएमपी) परीक्षा होणार असून या परीक्षा ३ ते ५ मे या कालवधीत होणार आहे. तर एमबीबीएसच्या प्रथम वर्ष नवीन पुरवणी परीक्षा ३ ते १५ या कालवधी होणार असल्याची माहिती परीक्षा विभाग नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आधुनिकमध्यमस्तरीय सेवक अभ्यासक्रमच्या परीक्षा ३ ते ७ मे या कालावधीत होणार असून पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा २४ ते ३० जून या कालावधीत होणार आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सुचनांनुसार हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले असून विद्यार्थ्यांनी परीक्षांसदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आहानही परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.