भूमिगत गटारीचे काम महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:03+5:302021-01-20T04:16:03+5:30
स्मार्ट सिटी कामासाठी खड्डे खोदले असल्याने सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. पंचवटी धार्मिक परिसर असल्याने दैनंदिन स्थानिक नागरिक तसेच ...
स्मार्ट सिटी कामासाठी खड्डे खोदले असल्याने सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. पंचवटी धार्मिक परिसर असल्याने दैनंदिन स्थानिक नागरिक तसेच भाविकांची ये-जा सुरू असते. नाशिक स्मार्ट सिटीअंतर्गत सरदार चौक ते रामकुंड रस्तावर सिवर लाईन टाकण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. खोदलेल्या खड्ड्यातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असून, रोज दिवसा ठेकेदार वीजपंप लावून खड्ड्यात साचलेले पाणी काढण्याचे काम करतो; मात्र रात्री पुन्हा पाणी भरते. हा खेळ मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक नागरिक या कामामुळे त्रस्त आहेत. प्रशासनाने हे काम लवकर पूर्ण केले, तर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल. सद्यस्थितीत रस्ता बंद असल्याने स्थानिक नागरिक व भाविकांची गैरसोय होत आहे तसेच गंगाघाट परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.