मुळडोंगरीत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:43 PM2019-06-26T22:43:39+5:302019-06-26T22:45:10+5:30
नांदगाव : मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरुस्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून, ते मजुरांकडून न करता जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले, या भगवान मोरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.

मोरे यांच्या तक्रारीची येथील पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून त्यांना नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागली. त्यावरून पुढील चक्रे फिरली. दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी मजुरांना काम मिळावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जॉब कार्डधारकांना दुरुस्ती व इतर हातांनी करावयाच्या कामाची कल्पना देऊन काम द्यावयाचे असा उद्देश आहे. मात्र प्रस्तुत प्रकरणात गरजूंच्या हातांना मिळणारे काम हिसकावून घेऊन यंत्राच्या साहाय्याने करण्यात आल्याच्या तक्रारीला गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाने टोपली दाखवल्याने वरिष्ठांना साकडे घालण्याची वेळ मोरे व इतरांवर आली. दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आलेले अंदाजे २० लाखांचे काम अद्याप ही अपूर्ण आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील लोकप्रतिनिधी व अधिकारी असे काही झालेच नाही. चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असा दावा करत आहेत.जेसीबीने काम करून घेणे फसवणूकमोरे यांच्या तक्रारीनुसार जेसीबीने काम करून घेणे ही शासनाची फसवणूक आहे, तर मजुरांच्या तोंडचा घास काढून घेऊन आपले खिसे भरण्याचा प्रकार आहे. चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मजुरांचे फावडे, घमेले असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. आता खोटे पुरावे सादर करण्याच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी एकवटले आहेत. मजुरांना न्याय मिळावा, अशी मोरे यांची मागणी आहे.